राधानगरी तालुक्यातील सरकारी कार्यालये गुगल मॅपवर दिसणार  (Pudhari Photo)
कोल्हापूर

Radhanagari Taluka News | राधानगरी तालुक्यातील तलाठी कार्यालये, सरकार सेवा केंद्रे गुगल नकाशावर

Kolhapur News | राधानगरीच्या तहसीलदार अनिता देशमुख यांची माहिती

पुढारी वृत्तसेवा

Government service centers Google Maps

गुडाळ : महाराष्ट्र शासनाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या सेवा पंधरवडा मोहिमे अंतर्गत नाविन्यपूर्ण उपक्रम म्हणून राधानगरी तालुक्यातील सर्व तलाठी कार्यालये, मंडल अधिकारी कार्यालये आणि आपले सरकार सेवा केंद्रे गुगल नकाशावर निश्चित करण्यात आली आहेत, अशी माहिती राधानगरीच्या तहसीलदार अनिता देशमुख यांनी दिली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून राज्य सरकारने सेवा पंधरवडा मोहिमेचे आयोजन केले आहे. या मोहिमे अंतर्गत महसूल विभागातील प्रलंबित कामाचा निपटारा, ग्रामस्थ - शालेय विद्यार्थ्यांना विविध दाखले देणे,पाणंद रस्ते खुले करणे आणि त्यांचे रुंदीकरण करणे आदी कामांबरोबरच अनेक नाविन्यपूर्ण उपक्रमही राबविण्यात येत आहेत.

त्या अंतर्गत मंगळवारी (दि. 30) पासून तालुक्यातील नागरिकांना सर्व तलाठी कार्यालये, मंडल अधिकारी कार्यालये आणि तालुक्यातील आपले सरकार सेवा केंद्रे कुठे कुठे आहेत याची अचूक माहिती गुगल नकाशावर उपलब्ध होणार आहे. या नावीन्यपूर्ण उपक्रमामुळे नागरिकांचा बहुमोल वेळ वाचणार आहे. नागरिकांनी या नावीन्यपूर्ण उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन मंडलाधिकारी प्रवीण पाटील यांनी केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT