Takliwadi soldier Rohit Khannikude dies in accident
दत्तवाड : पुढारी वृत्तसेवा
टाकळीवाडी तालुका शिरोळ येथील जवान रोहित परशुराम खन्निकुडे (वय 27) यांचे जम्मू काश्मीर येथे सेवा बजावत असताना अपघाती निधन झाले. त्यांच्या पक्षात पत्नी, आई-वडील, सैन्य दलात कार्यरत असलेले भाऊ तसेच भावजय असा परिवार आहे.
रोहित हे 2020 बेळगाव येथे सैन्य दलात भरती झाले होते. त्यांची प्रथम पोस्टिंग अरुणाचल प्रदेश येथे त्यानंतर चीन बॉर्डरवर व सध्या ते जम्मू काश्मीर येथे कर्तव्य बजावत होते. गुरुवार 16 एप्रिल रोजी रात्री साडेअकरा वाजता त्यांचे जम्मू कश्मीर येथे अपघाती निधन झाले.
त्यांचे पार्थिव रविवारी सकाळी ११:३० वाजता टाकळीवाडी येथे आणण्यात येणार आहे. रोहित यांचे पहिली ते सातवी पर्यंतचे शिक्षण कुमार विद्या मंदिर टाकळीवाडी येथे तर आठवी ते दहावीपर्यंतचे शिक्षण सरस्वती हायस्कूल टाकळीवाडी येथे झाले होते. तर पुढील शिक्षण कुरुंदवाड येथील दत्त कॉलेज येथे झाले होते. वर्षभरापूर्वीच त्यांचे लग्न झाले होते. या घटनेमुळे टाकळीवरडीवर शोककळा पसरली आहे.