कोल्हापूर : पूर्ववैमनस्यातून जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात श्रीनाथ गंगाराम कुचकोरवी (वय 28, रा. माकडवाला वसाहत, कावळा नाका) याच्यावर झालेल्या हल्लाप्रकरणी शाहूपुरी पोलिसांनी रविवारी मुख्य संशयित आदित्य ऊर्फ गब्बर सूर्यवंशीसह 5 जणांना अटक केली. न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलिस कोठडी दिली आहे.
अनिकेत अमर सूर्यवंशी (वय 22, रा. नागाळा पार्क), आदित्य ऊर्फ गब्बर अमर सूर्यवंशी (26, नागाळा पार्क), सुजल युवराज ढेरे (19, न्यू पॅलेस, पाटील मळा, कोल्हापूर), प्रतीक विजय नागावकर (20, सदर बाजार), ओंकार कुमार समुद्रे (24, विचारे माळ, कोल्हापूर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. तेजस संतोष जगताप (कसबा बावडा), तुषार कुमठे ही फरारी संशयिताची नावे आहेत, असे पोलिस निरीक्षक संतोष डोके यांनी सांगितले.
शनिवारी (दि.21) सायंकाळी दोन गटांत हाणामारीचा प्रकार घडला होता. त्यात श्रीनाथ कुचकोरवीसह आकाश विनोद सकटे जखमी झाला होता. या घटनेमुळे आदित्य चौकात दोन्हीही गटांकडील समर्थकांनी गर्दी केल्याने काही काळ तणावाची स्थिती निर्माण झाली होती. संशयितांची शनिवारी रात्री उशिरा धरपकड करून जेरबंद करण्यात आल्याचे तपास अधिकार्यांनी सांगितले.