Tawade Hotel area  
कोल्हापूर

तावडे हॉटेल परिसरात अतिक्रमित बांधकामांचे आजपासून सर्वेक्षण : आयुक्त डॉ. भारूड यांचे आदेश

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : कोल्हापूर ते गांधीनगर मार्गावरील तावडे हॉटेल परिसरात महापालिकेच्या जागेत झालेल्या अतिक्रमित बांधकामांचे शुक्रवार (दि. 24) पासून सर्वेक्षण करून चार दिवसांत अहवाल सादर करा, असे आदेश आयुक्त डॉ. राजेंद्र भारूड यांनी गुरुवारी अधिकार्‍यांना दिले.

सर्वेक्षणासाठी प्रत्येकी सात कर्मचारी असलेली पाच पथके नियुक्त केली आहेत. अहवालानंतर कारवाईच्या नोटिसा देण्यात येणार आहेत. दरम्यान, अतिक्रमण करून बांधलेल्या सर्व इमारतींची मोजमापे करून पडताळणी केली जाणार आहे. तसेच, घरफाळा व परवाना विभागामार्फत आवश्यक नोंदींची छाननीही करण्यात येणार आहे.

तावडे हॉटेल परिसरातील टीडीआर माफियांवर फौजदारी करा : शेटे

तावडे हॉटेल परिसरातील टीडीआर माफियांवर फौजदारी गुन्हे दाखल करा, अशी मागणी माजी उपमहापौर भूपाल शेटे यांनी आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.

तावडे हॉटेल ते गांधीनगर मार्गावर माफियांनी कोट्यवधींचे टीडीआर घेतले आहेत. कागदपत्रांसह सर्व पुरावे शासन आणि प्रशासनाला दिले आहेत. अनेकांनी टीडीआर घेऊनही अतिक्रमण केले आहे. संबंधित अतिक्रमित जागा कोल्हापूर महापालिकेच्या नावे आहे. तरीही ठरावीक अधिकारी त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहेत. तावडे हॉटेल परिसरातील जागा ताब्यात घेऊन तेथे कचरा डेपो, ट्रक टर्मिनस आणि डॉग शेल्टर सुरू करावे, असेही निवेदनात म्हटले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT