कोल्हापूर : कोल्हापूर पोलिस दलामध्ये 2024 वर्षात अतुलनीय कामगिरी बजाविणार्या राज्य गुन्हे (सीआयडी) अन्वेषण अधीक्षक मनीषा भीमराव दुबुले यांच्यासह कोल्हापूर पोलिस दलातील पोलिस निरीक्षक संजीव झाडे, सहायक निरीक्षक रवीराज फडणवीस, जालिंदर जाधवसह 17 हवालदारांना सोमवारी पोलिस महासंचालक यांचे विशेष सन्मान पदक जाहीर झाले.
पोलिस अधीक्षक मनीषा दुबुले यांच्यासह संजीवकुमार दत्तात्रय झाडे, सहायक निरीक्षक रवीराज अनिल फडणीस, सहायक निरीक्षक जालिंदर अंकुश जाधव, अनिल संभाजी जाधव, उपनिरीक्षक भरसू भारमान गावडे, उपनिरीक्षक महादेव नारायण कुराडे, जर्नादन शिवाजी खाडे, हवालदार संजय दिनकर कुंभार, राजू रामचंद्र पट्टणकुडे, अरुण रवींद्र खोत, सागर जगन्नाथ चौगले, हिंदुराव रामचंद्र केसरे, अनुराधा देवदास पाटील, युवराज भिवजी पाटील, रमेश श्रीपती कांबळे, संग्राम पांडुरग पाटील (राज्य राखीव दल) यांचा समावेश आहे. कोल्हापूरचे विशेष पोलिस महानिरीक्षक सुनील फुलारी, प्रभारी पोलिस अधीक्षक खाटमोडे-पाटील, शहर उपअधीक्षक अजित टिके यांनी त्यांचे अभिनंदन केले.