ऊस वाहतूक करणारे दोन ट्रॅक्टर पेटवले 
कोल्हापूर

Sugarcane Protest : ऊस वाहतूक करणारे दोन ट्रॅक्टर पेटवले

कापूरवाडी-तासगाव रस्त्यावरील प्रकार

पुढारी वृत्तसेवा

टोप : ऊस दरवाढीच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाला आता हिंसक वळण लागल्याची घटना समोर आली आहे. कापूरवाडी-तासगाव रस्त्यावर ऊस वाहतूक करणारे दोन ट्रॅक्टर अज्ञातांनी पेटवून दिल्याची घटना सोमवारी (दि. २६) रात्री घडली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

ऊस उत्पादक शेतकऱ्यांना त्यांच्या उसाला योग्य दर मिळावा, या मागणीसाठी विविध ठिकाणी आंदोलने सुरू आहेत. शेतकऱ्यांच्या ऊस दरवाढीच्या मागणीवरून आंदोलनाची तीव्रता वाढत असतानाच कापूरवाडी -तासगाव मार्गावर दोन ट्रॅक्टर जाळल्याची घटना घडल्याने परिस्थिती अधिक गंभीर बनली आहे. या घटनेत ऊस वाहतूक करणाऱ्या दोन्ही ट्रॅक्टरचे मोठेे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे. दरम्यान, या घटनेमुळे शेतकरी तसेच कारखानदारांत चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT