Beed sugarcane Contractor Murder | ट्रॅक्टर अंगावर घालून बीडच्या ऊस तोडणी मुकादमाचा खून 
कोल्हापूर

Beed sugarcane Contractor Murder | ट्रॅक्टर अंगावर घालून बीडच्या ऊस तोडणी मुकादमाचा खून

माडवळे येथील ऊस वाहतूकदाराला अटक

पुढारी वृत्तसेवा

चंदगड : ऊस वाहतूकदार व ऊस तोडणी टोळीचा मुकादम यांच्यात अ‍ॅडव्हान्स दिलेल्या पैशांच्या वसुलीवरून वाद सुरू होता. यातूनच मुकादमाच्या ताब्यात असणारा ट्रॅक्टर मध्यरात्री चोरून नेताना ट्रॅक्टरच्या आडवे आलेल्या मुकादमाच्या अंगावर ट्रॅक्टर घालून खून करण्यात आला. ही घटना शनिवारी (दि. 14) पहाटे एक वाजता दौलत - अथर्व साखर कारखान्याच्या गाडी अड्ड्यावर घडली.

या घटनेत उत्तम दगडू पाळवदे (वय 57, सध्या रा. दौलत - अथर्व साखर कारखाना अड्डा, हलकर्णी, ता. चंदगड व मूळगाव सासुरा पो. देवगाव, ता. केज, जि. बीड) या ऊस तोडणी मुकादमाचा मृत्यू झाला. संशयित आरोपी लक्ष्मण जानबा गावडे (रा. माडवळे, ता. चंदगड) याच्यावर चंदगड पोलिस ठाण्यात खुनाचा व जबरी चोरीचा गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे. याबाबतची फिर्याद मृत व्यक्तीचे भाऊ कैलास उत्तम पाळवदे (सासुरा ता. केज, जि. बीड, सध्या रा. दौलत - अथर्व साखर कारखाना अड्डा) यांनी चंदगड पोलिसांत दिली आहे.

फिर्यादी कैलास यांचे भाऊ व मृत व्यक्ती विलास उत्तम पाळवदे यांनी लक्ष्मण गावडे यांच्याकडून ऊस कामगार पुरवतो म्हणून परस्पर पैसे घेतले होते. उत्तम पैसे देत नसल्यामुळे वाद सुरू होता. त्यामुळे लक्ष्मण याने उत्तम यांच्या मालकीचा ट्रॅक्टर सुरू करून नेण्यात येत होता. यावेळी गाडी अड्ड्यातच झोपलेले उत्तम जागे झाले. ट्रॅक्टर नेत असल्याची जाणीव झाली. लक्ष्मण गावडे यांनी उत्तम यांच्या अंगावर ट्रॅक्टर घालून त्यांचा खून केला. त्यांच्यावर उपचार सुरू असताना कोल्हापूर येथील सीपीआर हॉस्पिटलमध्ये त्यांचा मृत्यू झाला.

पर जिल्ह्यातील अनेक ऊस तोडणी मुकादमाने चंदगड तालुक्यातील ऊस तोडणी ऊस वाहतूकदाराकडून अ‍ॅडव्हान्स घेऊन ऊस तोडणीची हमी दिली जाते. मात्र वेळ येताच अ‍ॅडव्हान्स पैसे घेऊन दुसरीकडेच काम करून हंगाम पूर्ण करून आपल्या गावी जातात. या प्रकारातून तालुक्यात कोट्यवधी रुपयांची फसवणूक झाली आहे. अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक विशाल मुळे करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT