Andolan Ankush | पहिली उचल पाच हजार, गत हंगामातील ३०० रुपये दिल्याशिवाय कारखाने सुरू करू देणार नाही  
कोल्हापूर

Andolan Ankush | पहिली उचल पाच हजार, गत हंगामातील ३०० रुपये दिल्याशिवाय कारखाने सुरू करू देणार नाही

धनाजी चुडमुंगे; शिरोळ येथे ‘आंदोलन अंकुश’ची ९ वी एल्गार सभा

पुढारी वृत्तसेवा

जयसिंगपूर : साखरेचे वाढलेले दर आणि दुष्काळी परिस्थिती पाहता, उसाला पहिली उचल ५,००० रुपये आणि गत हंगामातील दुसरा हप्ता ३०० रुपये मिळाल्याशिवाय कारखाने सुरू होऊ देणार नाही, असा इशारा ‘आंदोलन अंकुश’चे संस्थापक धनाजी चुडमुंगे यांनी दिला आहे. शिरोळ येथील छ. शिवाजी चौकात रविवारी आयोजित ९ व्या एल्गार सभेत ते बोलत होते.

चुडमुंगे म्हणाले, देशात साखरेचा तुटवडा असून बाजारात दर ५० रुपयांच्या वर आहेत. तसेच इथेनॉल, मोलॅसिस आणि बगॅस यांसारख्या उपपदार्थांनाही उच्चांकी दर मिळत आहेत. त्यामुळे कारखानदारांनी तोट्याचे नाटक न करता शेतकऱ्यांना ५,००० रुपये पहिली उचल द्यावी. जिल्हाध्यक्ष दीपक पाटील व राकेश जगदाळे यांनी साखर कारखानदार शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक करून तो पैसा निवडणुका व इतर कामांसाठी उधळत आहेत, अशी टीका केली.

ऊस दरासाठी रस्त्यावरची लढाई!

दुसरा हप्ता आणि पहिली उचल मिळेपर्यंत कारखाने सुरू होऊ देणार नाही. रक्ताचे पाट वाहिले तरी चालतील, पण उसाचा योग्य दर घेतल्याशिवाय थांबणार नाही, असा एल्गार शेतकरी नेत्यांनी सभेत केला. गेल्या २० वर्षांपासून शेतकऱ्यांच्या हक्कासाठी लढा देणाऱ्या ‘आंदोलन अंकुश’ने, जोपर्यंत दर जाहीर होत नाही तोपर्यंत शेतकऱ्यांनी कोणत्याही कारखान्याची ऊसतोड स्वीकारू नये, असे आवाहन केले आहे. जिल्हा उपाध्यक्ष उदय होगले यांनी मनोगत व्यक्त केले. आंदोलन अंकुशचे शिरोळ शहराध्यक्ष अक्षय पाटील, तालुकाध्यक्ष नागेश काळे, कृष्णा देशमुख, जितेंद्र चौगुले, शंकर बिराजदार, एकनाथ माने, संभाजी माने, महादेव काळे, पोपट संकपाळ उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT