कोल्हापूर

KDCC : आजऱ्यात सत्ताधारी गटाचे सुधीर देसाई विजयी, विद्यमान संचालक पराभूत

स्वालिया न. शिकलगार

कोल्हापूर: पुढारी ऑनलाईन

कोल्हापूर जिल्हा बॅंक निवडणुकीत आजाऱ्यातील विद्यमान संचालक अशोक चराटी पराभूत झाले आहेत. सत्ताधारी गटाचे सुधीर देसाई विजयी झाले आहेत. सुधीर यांना ५७ मते तर अशोक चराटी ४८ मते पडली आहेत.

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीची मतमोजणी शुक्रवारी सकाळी आठ वाजल्यापासून रमणमळा येथील बहुउद्देशीय हॉल येथे सुरू आहे.

महिनाभर जिल्ह्याचे राजकारण ढवळून काढणार्‍या जिल्हा बँक संचालकांच्या 21 जागांपैकी पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ, आ. पी. एन. पाटील, आ. राजेश पाटील, माजी आ. अमल महाडिक, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील यांची निवड बिनविरोध झाली.

मोठा पोलिस बंदोबस्त

जिल्ह्यातील 13 ठिकाणी 40 केंद्रांवर 7 हजार 651 पैकी तब्बल 7 हजार 498 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. शाहूवाडी, गडहिंग्लज आणि भुदरगड तालुका संस्था गटात 100 टक्के मतदान झाले. प्रक्रिया गटात 448 पैकी 446, पतसंस्था गटात 1,221 पैकी 1,207, इतर संस्था गटात 4,115 पैकी 3,995 असे सरासरी 98 टक्के चुरशीने मतदान झाले. वाढलेला मताचा टक्का कोणाच्या पथ्यावर पडणार, याची उत्कंठा सर्वच घटकांना आहे.

SCROLL FOR NEXT