कोल्हापूर

कोल्हापूरची कन्या सुधा मूर्ती राज्यसभेवर

मोहन कारंडे

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा : कोल्हापूरच्या मातीत मी घडले. माझे कोल्हापूरशी जिव्हाळ्याचे संबंध आहेत. इथे तोंडावर एक आणि माघारी एक बोलण्याची सवय नाही, त्यामुळेच मी माझी परखड मते मांडते माझ्यावरील संस्कारामध्ये कोल्हापूरचे योगदान असून कोल्हापूरची मुलगी असल्याचा अभिमान बाळगणाऱ्या, इन्फोसीस फाऊंडेशनच्या अध्यक्षा सुधा मूर्ती यांची राज्यसभेवर खासदार म्हणून नियुक्ती झाली आहे. या नियुक्तीनंतर मूर्ती यांच्या कोल्हापुरातील आठवणींना उजाळा मिळाला.

तब्बल सत्तर वर्षांनंतर नोव्हेंबर २०२२ मध्ये कोल्हापुरात आलेल्या मूर्ती यांनी बहीण मंगला कुलकर्णी यांच्यासमवेत रंकाळा भेट दिली, अंबाबाईचे दर्शन घेतले. कोल्हापुरात बालपण ज्या घरात घालवले ते घर पाहताना त्या चांगल्याच भावुक झाल्या होत्या. यानंतर त्यांनी कुरुंदवाड येथे राहत असलेल्या घरालाही भेट देत त्या आठवणी जाग्या केल्या होत्या.

यानंतर सांगली येथे झालेल्या एका कार्यक्रमात मुलाखत देताना मूर्ती यांनी कोल्हापूरशी असणारे ऋणानुबंध सांगत माझी मराठी पुणेरी नव्हे तर ती कोल्हापुरी आहे. माझी मराठी पैलवानी आहे, माझे घर, येथील जिव्हाळा मी कधीही विसरू शकत नाही, मला कोल्हापूरची मुलगी असल्याचा अभिमान आहे, अशा भावना व्यक्त करतानाच माझ्या मनात कुरुंदवाड आणि कोल्हापूरच्या आठवणी कायम आहेत. घर म्हटले की दोनच घरे नजरेसमोर येतात, ते म्हणजे कुरुंदवाड आणि कोल्हापूरचे घर अशा शब्दांत मूर्ती यांनी आपल्या आठवणी जागवल्या होत्या. त्यांच्या राज्यसभेवरील कोल्हापूरवासीयांतही वातावरण आहे. नियुक्तीने आनंदाचे सुधा मूर्ती यांनी अंबाबाई मंदिरात जाऊन देवीचे दर्शन घेतले होते. त्यावेळी कोल्हापुरातील अनेक आठवणींना त्यांनी उजाळा दिला होता.

SCROLL FOR NEXT