ईशिता सावंत 
कोल्हापूर

kolhapur | शिवाजी विद्यापीठ वसतिगृहात विद्यार्थिनीने जीवन संपविले

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठ येथील महिला वसतिगृहाच्या खोलीमध्ये ईशिता मधुसुदन सावंत (वय 23, रा. गोवा) या विद्यार्थिनीने गळफास घेऊन जीवन संपविले. शुक्रवारी मध्यरात्री हा प्रकार उघडकीस आला. राजारामपुरी पोलिस ठाण्यात घटनेची नोंद झाली आहे. आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही.

ईशिता एम.ए. द्वितीय वर्षात शिक्षण घेत होती. वसतिगृहामधील खोली क्रमांक 30 मध्ये चार मैत्रिणींसह तिचे वास्तव्य होते. गुढीपाडव्याच्या सुट्टीनिमित्ताने तिन्हीही मैत्रिणी परगावी गेल्या होत्या. शुक्रवारी दिवसभर ईशिता एकटीच खोलीत होती. रात्री 11 वाजण्याच्या सुमारास वॉर्डन शीला सोनवणे यांनी वसतिगृहातील खोल्यांची तपासणी केली. खोली क्रमांक 30 चा दरवाजा आतील बाजूने बंद असल्याचे निदर्शनास आले.

सोनवणे यांनी दरवाजा ठोठावला; पण प्रतिसाद मिळाला नसल्याने विद्यार्थिनींनी खिडकीतून खोलीत डोकावले. ईशिताने छताच्या हुकाला गळफास घेऊन जीवन संपविल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी मृतदेह शासकीय रुग्णालयात हलविला. उत्तरीय तपासणीनंतर पहाटे नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेतला. ईशिताच्या वापरातील मोबाईल राजारामपुरी पोलिसांनी ताब्यात घेतला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT