गडहिंग्लज : येथे शिवस्वराज्य यात्रेमध्ये बोलताना प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील. व्यासपीठावर उपस्थित मान्यवर. Pudhari File Photo
कोल्हापूर

पराभव दिसत असल्यानेच मुश्रीफांकडून चुकीची वक्तव्ये

पुढारी वृत्तसेवा

गडहिंग्लज : पराभव दिसायला लागला की, तोल नक्कीच जातो. त्यातूनच चुकीची वक्तव्ये बाहेर पडतात, असे प्रतिपादन राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांनी केले. गडहिंग्लज येथे शिवस्वराज्य यात्रेमध्ये ते बोलत होते.

स्वागत शिवानंद माळी यांनी केले. यावेळी अमर चव्हाण, व्ही. बी. पाटील, सुनील गव्हाणे, मेहबूब शेख यांनी ना. मुश्रीफ यांच्यावर जोरदार टीका केली. डॉ. नंदा बाभूळकर यांनी गडहिंग्लजचा स्वाभिमान दाखवून देऊया, पाठीत खंजीर खुपसणार्‍यांना जागा दाखवूया, असे स्पष्ट केले.

समरजित घाटगे यांनी, या मतदारसंघामध्ये काय करणार याचे व्हिजन मी तुमच्यासमोर मांडत आहे. माझ्याकडे विकासकामांचे नियोजन आहे. यामुळे मी तुमच्याकडे त्याच जोरावर मते मागणार आहे, असे सांगितले.

खा. अमोल कोल्हे यांनी, गडहिंग्लज हे निष्ठेचे प्रतीक असून येथे ज्यांनी निष्ठा धुळीस मिळवली त्यांना धुळीस मिळवा, असे सांगितले.

आ. पाटील म्हणाले, शरद पवार इकडे एकदा येऊन गेले. हा ट्रेलर असून आता येतील त्यावेळी पूर्ण पिक्चरच असेल. यावेळी नवोदिता घाटगे, आर. के. पोवार उपस्थित होते. आभार युवराज बरगे यांनी मानले.

पुस्तकात कामांसमोर ठेकेदाराचे नाव लिहा...

या सभेत घाटगे यांनी, मुश्रीफ त्यांनी केलेल्या कामाचे पुस्तक काढणार आहेत. त्यांच्यामध्ये हिंमत असेल तर त्यांनी त्या पुस्तकात कामांसमोर ठेकेदाराचे नाव लिहावे, असे आव्हान देताना केवळ चार ठेकेदारांसाठीच तुम्हाला मतदान करावे लागेल, त्यामुळे विचार करूनच निर्णय घ्या, असे स्पष्ट केले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT