कोल्हापूर : दै. ‘पुढारी’ एज्यु-दिशा प्रदर्शनातील विविध शैक्षणिक संस्थांच्या स्टॉलवर माहिती घेण्यासाठी रविवारी विद्यार्थ्यांसह पालकांची झालेली गर्दी.  (छाया : पप्पू अत्तार)
कोल्हापूर

Pudhari Edudisha 2026 | ‘एज्यु-दिशा’ प्रदर्शनास उत्स्फूर्त प्रतिसाद

आज शेवटचा दिवस; विद्यार्थी, पालकांकडून समाधान

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : दहावी, बारावीनंतर उच्च शिक्षण, व्यावसायिक अभ्यासक्रम, स्पर्धा परीक्षा तसेच विविध शैक्षणिक संधींची माहिती एकाच छताखाली उपलब्ध झाल्याने विद्यार्थी, पालकांनी समाधान व्यक्त केले. रविवारच्या सुट्टीच्या दिवशीही ‘एज्यु-दिशा’ शैक्षणिक प्रदर्शनास उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

दै. ‘पुढारी’ आयोजित ‘एज्यु-दिशा-2026’ शैक्षणिक प्रदर्शन राजारामपुरीतील डॉ. व्ही. टी. पाटील सभागृहात सुरू आहे. शैक्षणिक प्रदर्शनाचे संजय घोडावत युनिव्हर्सिटी, कोल्हापूर हे मुख्य प्रायोजक आहेत. पॉवर्ड बाय प्रायोजक म्हणून ‘विश्वकर्मा युनिव्हर्सिटी, पुणे आहेत. सहयोगी प्रायोजक म्हणून एमआयटी विश्वप्रयाग युनिव्हर्सिटी, तर एमआयटी एडीटी युनिव्हर्सिटी पुणे, भारती विद्यापीठ डीम्ड युनिव्हर्सिटी, चाटे ग्रुप सहप्रायोजक आहेत.

प्रदर्शनात पारंपरिक अभ्यासक्रमांसह इंजिनिअरिंग, मेडिकल, अ‍ॅग्रीकल्चर, आर्टिफिशियल इंटिलिजन्सचे शिक्षण देणार्‍या कोल्हापूरसह पुणे, मुंबई, सातारा येथील विविध महाविद्यालये, विद्यापीठे व शैक्षणिक संस्थांनी सहभाग नोंदविला. विविध क्षेत्रांतील नामवंत, तज्ज्ञ मार्गदर्शकांनी विद्यार्थ्यांना अभ्यासक्रम, प्रवेश प्रक्रिया, शिष्यवृत्ती योजना व करिअरच्या संधींबाबत मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी विविध स्टॉलना भेट देत आवडीच्या क्षेत्रांबाबत माहिती जाणून घेतली. पालकांनीही शैक्षणिक प्रदर्शनाचे कौतुक करत विद्यार्थ्यांच्या करिअर नियोजनासाठी अशा उपक्रमांची गरज व्यक्त केली. तज्ज्ञांच्या मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांना भविष्यातील शैक्षणिक वाटचालीसाठी दिशा मिळाल्याचे मत शिक्षक, पालकांनी व्यक्त केले. प्रदर्शनामुळे विद्यार्थांना करिअरसाठी योग्य शैक्षणिक पर्याय निवडण्यास मोठी मदत झाली.

दै. ‘पुढारी’च्या सत्काराने विद्यार्थी, पालक भारावले

दै. ‘पुढारी’च्या वतीने दहावी, बारावीच्या परीक्षेत 80 टक्क्यांहून अधिक गुण मिळवणार्‍या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. दोन दिवस प्रदर्शनात शहरातील शाळा, महाविद्यालयांतील हजारो विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. दै. ‘पुढारी’ने केलेल्या सत्काराने विद्यार्थ्यांसह पालकदेखील भारावून गेले होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT