शाहू मिल चौकात भरधाव चारचाकीने दुचाकींना उडविल्यानंतर पलटी झाली Pudhari
कोल्हापूर

Kolhapur Accident | कोल्हापुरातील शाहू मिल चौकात भीषण अपघात, कार पलटी, दुचाकीचा चुराडा; २ ठार, ५ जण जखमी

कसबा बावडा येथील महिलेसह एकाचा मृत्यू

पुढारी वृत्तसेवा

Speeding Car Accident Kolhapur

कोल्हापूर : कोल्हापूर शहरातील शाहू मिल चौकात आज (दि.७) भीषण अपघाताची घटना घडली. या अपघातात भाग्यश्री लक्ष्मण गवळी (वय ३०, रा. कसबा बावडा) आणि दीपक महादेव वंशी (वय ६२, रा. सनगर गल्ली, कोल्हापूर) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, शाहू मिल चौकात भरधाव चारचाकीने दुचाकींना उडविले. या भीषण अपघातात घटनास्थळीच दोन जणांचा मृत्यू झाला. अपघातात आणखी पाच जण गंभीर जखमी झाले आहेत.

जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन वाहतूक नियंत्रणात आणली. काही काळ या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. या दुर्दैवी घटनेमुळे मृतांच्या कुटुंबीयांवर शोककळा पसरली असून परिसरात शोक व्यक्त केला जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT