Speeding Car Accident | भरधाव कार गॅरेजमध्ये घुसली; चालकाचा मृत्यू 
कोल्हापूर

Speeding Car Accident | भरधाव कार गॅरेजमध्ये घुसली; चालकाचा मृत्यू

तरुण गंभीर जखमी; गाड्यांसह शेडचे मोठे नुकसान

पुढारी वृत्तसेवा

आजरा : आजरा-आंबोली रोडवरील हॉटेलजवळ भरधाव कार रस्त्यालगत असलेल्या गॅरेजमध्ये घुसून झालेल्या अपघातात चालकाचा मृत्यू झाला. धनराज प्रतापराव कल्याणकर (वय २३, रा. भोकर, जि. नांदेड) असे त्याचे नाव आहे. तर शुभम श्रीमंत कावळे (२७, रा. तेरडा, देवतानगर, साईनगर, जि. नांदेड) हा तरुण गंभीर जखमी झाला. सोमवारी पहाटे पाचच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेची आजरा पोलिसात नोंद झाली आहे.

कल्याणकर हा चारचाकीने आजरा-आंबोली रोडवरून जात होते. हॉटेलजवळ त्याची कार रस्त्यालगत असलेल्या गॅरेजमध्ये घुसली. या अपघातात कारमधील दोघे गंभीर जखमी झाले. त्यांना खासगी रुग्णालयात दाखल केले; मात्र उपचारादरम्यान कल्याणकर याचा मृत्यू झाला. कावळे याच्यावर उपचार सुरू आहेत. गॅरेजमधील गाड्यांचे तसेच शेड आणि रॅम्पचे नुकसान झाले. भरवस्तीजवळ घडलेल्या या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली. या प्रकरणी आजरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गतवर्षीच्या स्फोटाची आठवण

दहा महिन्यांपूर्वी आंबोली मार्गावरच गॅरेजमध्‍ये स्फोट होऊन अमित कडवळ यांच्या कारचे नुकसान झाले होते. त्या घटनेची चर्चा घटनास्थळी होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT