Bike Accident | भरधाव दुचाकीस्वाराने ठोकरल्याने माजी नगरसेवक पुत्रासह तिघे गंभीर File Photo
कोल्हापूर

Bike Accident | भरधाव दुचाकीस्वाराने ठोकरल्याने माजी नगरसेवक पुत्रासह तिघे गंभीर

सेंट झेव्हियर्स स्कूलजवळील घटना; मोपेडचा चक्काचूर

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : रमणमळा चौकातून महावीर कॉलेजच्या दिशेने भरधाव जाणार्‍या दुचाकीस्वाराने मोपेडला जोरात धडक दिल्याने माजी नगरसेवक राजाराम गायकवाड यांचे पुत्र गौतम (40), त्यांची पत्नी सारिका (35, रा. न्यू पॅलेस, रमणमळा) व अल्पवयीन दुचाकीस्वार (रा. कनाननगर) हे गंभीर जखमी झाले. गौतम गायकवाड यांच्या डोक्याला गंभीर इजा झाल्याने त्यांची प्रकृती चिंताजनक बनली आहे.

कसबा बावडा रोडवर सेंट झेवियर्स स्कूलच्या कोपर्‍यावर शुक्रवारी दुपारी अडीच वाजता ही घटना घडली. जखमी गौतम, सारिका गायकवाड यांच्यावर खासगी रुग्णालयात तर जाधव याच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघातात मोपेडचा चक्काचूर झाला आहे. जखमीच्या नातेवाईकांनी रुग्णालयात मोठी गर्दी केली होती.

गायकवाड दाम्पत्य वारणा कॉलनी येथील नातेवाईकांना भेटून मोपेडने वारणा कॉलनी रस्त्याने रमणमळ्याकडे जाणार्‍या मुख्य रस्त्याच्या दिशेने जात असतानाच रमणमळ्याकडून महावीर कॉलेजच्या दिशेने भरधाव दुचाकीने मोपेडला जोरात धडक दिली. त्यात गौतम व सारिका काही अंतरावर रस्त्यावर फेकले गेले. दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला. अपघाताची माहिती मिळताच शाहूपुरीचे पोलिस घटनास्थळी दाखल झाले. माजी नगरसेवक गायकवाडसह रमणमळा येथील तरुणांनी धाव घेतली. शाहूपुरी पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद झाली आहे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT