Spam Calls | वर्षभरात स्पॅम कॉल्सच्या तक्रारी ६०% वाढल्या! 
कोल्हापूर

Spam Calls | वर्षभरात स्पॅम कॉल्सच्या तक्रारी ६०% वाढल्या!

‘डू नॉट डिस्टर्ब’ फिल्टरमधूनही घुसखोरी

पुढारी वृत्तसेवा

आशिष शिंदे

कोल्हापूर : फोन वाजतो, अनोळखी नंबर दिसतो आणि कॉल उचलताच क्रेडिट कार्ड, कर्ज किंवा गुंतवणुकीच्या ऑफर्सचा भडिमार सुरू होतो. सर्वेक्षणानुसार, ९७ टक्के मोबाईल ग्राहकांना दररोज असे स्पॅम कॉल्स येतात. धक्कादायक म्हणजे, ‘डू नॉट डिस्टर्ब’ सुविधा असूनही ही कटकट कायम आहे. २०२५ मध्ये स्पॅम कॉल्सच्या तक्रारी ६० टक्क्यांनी वाढून ३१ लाख ९ हजार ८३५वर पोहोचल्या आहेत.

जानेवारी ते जून २०२६ मध्ये २० लाख ७५ हजार ९८ अनसॉलिसिटेड कमर्शिअल कम्युनिकेशन तक्रारी नोंदल्या गेल्या. त्यापैकी १७ लाख २१ हजार ५८२ (८२ टक्क्यांहून अधिक) तक्रारी नोंदणी नसलेल्या टेलिमार्केटर्स विरोधात होत्या, अशी माहिती केंद्र सरकारने दिली आहे. सरकारी यंत्रणांनी मे २०२६ मध्ये दररोज २६.४ कोटींहून अधिक कॉल्स व एसएमएस संशयित स्पॅम म्हणून फ्लॅग केले. ‘डू नॉट डिस्टर्ब’ची सुविधा असूनही मोबाईलवर असे कॉल्स आणि संदेश येत आहेत. जानेवारी ते जून २०२६ या अवघ्या सहा महिन्यांत १७ लाख २१ हजार ५८२ अनसॉलिसिटेड कमर्शिअल कम्युनिकेशन तक्रारी नोंदल्या गेल्या. यामुळे स्पॅम कॉल्स रोखण्यासाठी नियम आणि कारवाई असूनही नोंदणी नसलेल्या स्रोतांकडून होणारा व्यावसायिक संपर्क हे मोठे आव्हान बनले आहे.

एआयमुळे धोका

एआयच्या मदतीने केलेल्या बनावट कॉल्समुळे फसवणुकीचा धोका आणखी वाढला आहे. आवाज कॉपी करून नातेवाईक, बँक अधिकारी, कंपनीतील वरिष्ठ किंवा सरकारी अधिकारी असल्याचे भासवणे शक्य होत असल्याने सायबर फसवणुकीचा धोका वाढला आहे.

* स्पॅम कॉल्स म्हणजे मोबाईल वापरकर्त्याने मागणी किंवा परवानगी न देता येणारे अनाहूत कॉल्स. दूरसंचार नियमनाच्या भाषेत अशा अनाहूत व्यावसायिक संपर्काला अनसॉलिसिटेड कमर्शिअल कम्युनिकेशन (यूसीसी) म्हटले जाते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT