पोलिस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता- डॉ. प्रतापसिंह जाधव यांच्यात चर्चा Pudhari File Photo
कोल्हापूर

पोलिस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता- डॉ. प्रतापसिंह जाधव यांच्यात चर्चा

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : पोलिस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता यांनी शुक्रवारी दै. ‘पुढारी’चे मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी डॉ. जाधव यांच्याशी विविध विषयांवर चर्चा केली. मुंबई उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच कोल्हापुरात व्हावे, याकरिता आपले मोठे योगदान असल्याचे त्यांनी सांगितले.

मुंबई उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच कोल्हापुरात सुरू झाले आहे. मात्र, यामागे असणारा मोठा संघर्ष याकरिता दै. ‘पुढारी’च्या बळावर उभारलेला आणि यशस्वी झालेला लोकलढा, या मागणीसाठी झालेली आंदोलने, या आंदोलनातील प्रत्यक्ष सहभाग यांसह भविष्यात खंडपीठाची मागणी, जागेची उपलब्धता आणि प्रत्यक्ष कामकाज आदींबाबत डॉ. जाधव आणि गुप्ता यांच्यात चर्चा झाली. शहरासह जिल्ह्यातील वाहतूक व्यवस्थेबाबतही यावेळी चर्चा झाली. सर्किट बेंचसह जिल्ह्यातील सामाजिक, राजकीय क्षेत्रांसह विविध विषयांवर गुप्ता यांनी डॉ. जाधव यांच्याशी संवाद साधला. ‘पुढारी’ परिवाराच्या वतीने डॉ. जाधव यांनी पुष्पगुच्छ देऊन गुप्ता यांचे स्वागत केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT