गडचिरोली येथील कारकिर्दीत धाडसी, कौतुकास्पद कामगिरीबद्दल कोल्हापूरचे पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांचा केंद्रिय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते गौरव झाला. यावेळी पोलिस दलातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.  
कोल्हापूर

Central ministry certificate | पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांना केंद्रीय मंत्रालयाकडून विशेष प्रशंसा प्रमाणपत्र

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : गडचिरोली येथील कारकिर्दीतील धाडसी, कौतुकास्पद कामगिरीची दखल घेत कोल्हापूरचे पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांना केंद्रीय गृह मंत्रालयाकडून विशेष प्रशंसा प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. नक्षलग्रस्त,अतिदुर्गम भागात कायदा-सुव्यवस्था प्रभावीपणे राखणे, विविध सामाजिक उपक्रमाची दखल घेऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते त्यांचा गौरव करण्यात आला.

गृह मंत्रालय, भारत सरकार, छत्तीसगड शासन, महाराष्ट्र पोलिस दल यांच्या समन्वयातून छत्तीसगड राज्यातील बस्तर येथे दि. 18 मे रोजी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यासोबत छत्तीसगड सीमावर्ती अतिदुर्गम कोटगुल गावापासून प्रेरणा घेऊन नक्षलग्रस्त भागातील युवकांना मुख्य प्रवाहात आणण्याच्या उद्देशाने अभिनव शैक्षणिक उपक्रम राबविला. या नावीन्यपूर्ण उपक्रमासाठी त्यांना ‘नेक्सस ऑफ गुड’ या राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कारानेही गौरविण्यात आले. नीलोत्पल यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र-छत्तीसगड सीमावर्ती भागात सी-60 पथकामार्फत राबविण्यात आलेल्या यशस्वी मोहिमेमुळे नक्षलविरोधी कारवायांना गती मिळाली.

हा सन्मान पोलिसांवर विश्वास ठेवणार्‍या जनतेचा

केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या हस्ते गौरविण्यात आल्यानंतर पोलिस अधीक्षक नीलोत्पल म्हणाले, हा सन्मान माझा एकट्याचा नाही. दुर्गम भागात प्राणाची बाजी लावून काम करणार्‍या माझ्या सहकार्‍यांचा, महाराष्ट्र पोलिस दलाचा आणि पोलिस यंत्रणेवर विश्वास ठेवणार्‍या जनतेचा आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT