Maa Durga Immersion Procession | दुर्गामूर्ती विसर्जन मिरवणुकीत १० पर्यंतच साऊंडला परवानगी Pudhari Photo
कोल्हापूर

Maa Durga Immersion Procession | दुर्गामूर्ती विसर्जन मिरवणुकीत १० पर्यंतच साऊंडला परवानगी

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : दुर्गा मूर्ती विसर्जन मिरवणूक बुधवारी (दि. २१) होत असून, दोन बेस दोन टॉपसह रात्री १० पर्यंतच साऊंडला पोलिस प्रशासनाने परवानगी दिली आहे. प्रेशर मिड, सीओटू, लेझरच्या वापरास बंदी घातली आहे. तसेच १० बाय १२ फुटांच्या स्ट्रक्चरला परवानगी दिल्याची माहिती पोलिस निरीक्षक किरण लोंढे यांनी दिली.

रविवारी सायंकाळी जुना राजवाडा पोलिस ठाण्यात दुर्गा मूर्ती विसर्जन मिरवणुकीत सहभागी होणाऱ्या २२ मंडळांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना नंबरप्रमाणेच मिरवणुकीत सहभागी होण्याच्या सूचना देण्यात आल्या.

१. टेंबे रोड ते मिरजकर तिकटी मार्गावर अष्टविनायक तरुण मंडळ, गोल्डन बॉईज, शिवाजी तालीम कला, क्रीडा व सांस्कृतिक मंडळ, टाकाळ्याची माऊली नवरात्र उत्सव मंडळ, न्यू मित्र प्रेम फ्रेंडस् सर्कल, यादवनगर,

२. खरी कॉर्नर ते बिनखांबी गणेश मंदिर मार्गावरून नाथा गोळे तालीम मंडळ, दत्त तरुण मंडळ, सरनाईक कॉलनी, सनी स्पोर्टस्, माळे गल्ली, मॅडमॅक्स ग्रुप, जुना वाशी नाका, श्री स्वामी समर्थ भक्त मंडळ, टिंबर मार्केट, न्यू एकता तरुण मंडळ, स्टाईल ग्रुप, सुधाकर जोशी नगर, जय भवानी तरुण मंडळ, सरनाईक कॉलनी, मरगाई तरुण मंडळ, टिंबर मार्केट.

३. कोळेकर तिकटी ते मिरजकर तिकटीवरून श्री स्वामी समर्थ मित्र मंडळ, श्री मरगाई तरुण मंडळ, सुधाकर जोशी नगर, बालाजी पार्क मित्र मंडळ, श्रीराम तरुण मंडळ, राम गल्ली, मंगळवार पेठ,

४. ताराबाई रोड ते महालक्ष्मी चौक मार्गावरून व्ही बॉईज, बुधवार पेठ, मस्कुती हायकर्स प्रणित जॉन संघटना, शुक्रवार पेठ, शिव सोल्जर ग्रुप, तटाकडील तालीम, छत्रपती शिवाजी पेठ, श्री विघ्नहर्ता तरुण मंडळ, फुलेवाडी.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT