सोळांकूर : येथील ग्रामीण रुग्णालयतील डॉक्टरांना ग्रामस्थांनी घेराव घालून विवाहितेच्या मृत्यूचा जाब विचारला.  (छाया : व्ही. डी. पाटील, सरवडे)
कोल्हापूर

Solankur Pregnancy Death | सोळांकुरात प्रसूतीदरम्यान विवाहितेचा मृत्यू

मृतदेह नातेवाईकांनी ताब्यात न घेतल्याने तणाव; ग्रामस्थांचा रुग्णालयावर मोर्चा

पुढारी वृत्तसेवा

सरवडे : सोळांकूर (ता. राधानगरी) येथील ग्रामीण रुग्णालयात सानिका गणेश पोतदार (वय 22) या विवाहितेचा प्रसूतीनंतर मृत्यू झाला. परंतु, नातेवाईक व ग्रामस्थांनी सोळांकूर येथील डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे सानिकाचा मृत्यू झाल्याचा आरोप करत डॉक्टरांवर कारवाई केल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचा पवित्रा घेतल्याने वातावरण तणावपूर्ण बनले होते.

प्रसूती सिझेरीन करुन बाळाला जन्म दिला. यानंतर काही वेळात तिची प्रकृती खालावली. तिला व्हेंटिलेटरवर ठेवून रुग्णवाहिकेतून सीपीआर रुग्णालयात दाखल केले असता तिचा मृत्यू झाला. विवाहितेचा मृत्यू झाल्याचे समजताच गुरुवारी रात्री सोळांकूर ग्रामीण रुग्णालय येथे नातेवाईक व ग्रामस्थांनी डॉक्टरांना घेराव घालून विवाहितेचा मृत्यू हा येथेच उपचारादरम्यान हलगर्जीपणामुळे झाल्याचा आरोप करत दोषींवर कारवाई झालेखेरीज मृतदेह ताब्यात घेतला जाणार नाही, असा पवित्रा शिवानंद महाजन, विकास पाटील, अरविंद निचीते, रावसाहेब पानारी, संजय कांबळे, रणजित मुधोळकर, संजय परीट, दिनेश पाटील, मिथुन पानारी, संकेत कदम, अनिल पानारी, मिलिंद कुंभार आदींसह ग्रामस्थांनी घेतला. सानिकाचा विवाह चार वर्षांपूर्वी गणेश पोतदार याच्याशी झाला होता. तिचे पहिले बाळ पोटातच सात महिन्याचे असताना दगावले होते. दुसरा मुलगा अडीच वर्षांचा आहे.

दोन चिमुकली पोरकी

विवाहितेचा मृत्यू झाल्यामुळे तिची अडीच वर्षे व एक दिवसाची ही दोन मुले मातृत्वाला पोरकी झाली. ग्रामस्थांनी रुग्णालयातील भोंगळ व निष्काळजी कारभारावर ताशेरे ओढत रुग्णालयावर मोर्चा काढून रुग्णालय प्रशासनाचा निषेध केला व दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT