कोल्हापूर : गोवा बनावटीच्या दारूची तस्करी करणार्या टोळीचा म्होरक्या चेतक भरत वाळवे (वय 29, रा. वाळवेवाडी, ता. कणकवली, सिंधुदुर्ग) याच्यासह चौघांना स्थानिक गुन्हे अन्वेषणने शनिवारी बेड्या ठोकल्या. संशयितांकडून 24 लाखांचा दारूसाठा, टेम्पो, मोटार असा 38 लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. जेरबंद केलेल्यात कोल्हापूर येथील फारूक दस्तगीर जमादार (रा. नाळे कॉलनी, संभाजीनगर) याचा समावेश आहे.
अटक केलेल्यात चेतक वाळवेसह तुषार तुकाराम वाळवे (22, वाळवेवाडी, कणकवली), शहाबाज अब्दुल गोरे (27, मुस्लिमवाडी, माणगाव, ता. कुडाळ, सिंधुदुर्ग), फारूक जमादार, (38, नाळे कॉलनी, कोल्हापूर) यांचा समावेश आहे.