Adhikmas Tradition | अधिकमासात जावयासाठी चांदीची चप्पल, रूपेरी झोपाळा अन् चक्क ऐटदार घोडाही! 
कोल्हापूर

Adhikmas Tradition | अधिकमासात जावयासाठी चांदीची चप्पल, रूपेरी झोपाळा अन् चक्क ऐटदार घोडाही!

काळासोबत बदलला मानपानाचा थाट; अधिकमासाची उत्साहात सांगता

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा

अधिक महिना म्हटला की लेकीची ओटी, जावयाचा मानपान आणि चांदीच्या वस्तूंची खरेदी हे चित्र हमखास डोळ्यांसमोर उभे राहते. चांदीची वाटी, तबक आणि कड्यांपासून सुरू झालेला जावयाच्या मानपानाचा प्रवास आता चक्क चांदीची कोल्हापुरी चप्पल, रूपेरी झोपाळा आणि ऐटदार घोड्यापर्यंत येऊन पोहोचला आहे.

अधिकमासात जावयाला वाण देण्याची परंपरा जुनीच असली, तरी भेटवस्तूंचा थाट मात्र दिवसेंदिवस रंगतदार होत चालल्याची चर्चा रंगली. तीन वर्षांनी येणारा अधिक महिना हा धार्मिकदृष्ट्या दान, पुण्य आणि कृतज्ञतेचा महिना मानला जातो. आईची ओटी भरणे आणि जावयाला वाण देणे ही परंपरा आजही तितक्याच श्रद्धेने पाळली जाते. मात्र, बदलत्या जीवनशैलीमुळे मानपानाच्या भेटींचे स्वरूपही बदलत गेले आहे. रविवारी (दि. १४) अधिकमासाची सांगता झाली. पण यंदाही अशाच आगळ्यावेगळ्या

भेटवस्तूंच्या चर्चांनी रंगत आणली.

जावयाला दिले चक्क जीवनदान!

छत्रपती संभाजीनगरमधील एका सासरेबुवांनी दिलेली भेट मात्र सर्वांपेक्षा वेगळी आणि अनमोल ठरली. आपल्या जावयाचे प्राण वाचवण्यासाठी त्यांनी स्वतःची किडनी दान करत त्याला अक्षरशः जीवनदान दिले.

परंपरा तीच, बदलला थाट

दीड किलो चांदीची करकरीत कोल्हापुरी चप्पल

कोल्हापूर जिल्ह्यातील सासरेबुवांनी जावयाला तब्बल दीड किलो चांदीची कोल्हापुरी चप्पल भेट दिली.

घोडाही बनला मानपानाचा भाग

धाराशिवमधील एका हौशी सासरेबुवांनी आपल्या जावयाला जातिवंत घोडा भेट दिला.

रूपेरी झोपाळ्याचीही चर्चा

सातारा जिल्ह्यातील जावईबापूंसाठी सासरेबुवांनी चांदीचा झोपाळा तयार करून भेट दिला.

श्वानप्रेमी जावयासाठी सहा लाखांचा कुत्रा

नाशिक जिल्ह्यातील एका सासरेबुवांनी आपल्या श्वानप्रेमी जावयाची आवड जपत त्याला सुमारे सहा लाख रुपये किमतीचा दुर्मीळ जातीचा कुत्रा भेट दिला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT