कोल्हापूर : सिद्धार्थनगर-राजेबागस्वार परिसरात दोन गटांत झालेल्या दंगलीप्रकरणी लक्ष्मीपुरी पोलिसांनी मंगळवारी आणखी 5 जणांना अटक केली. न्यायालयाने त्यांना 3 दिवसांची पोलीस कोठडी दिली. फरारी संशयितांचा शोध घेण्यात येत असल्याचे पोलिस निरीक्षक श्रीराम कण्हेरकर यांनी सांगितले.
गणेश दगडू कांबळे (वय 37, सिद्धार्थनगर, कोल्हापूर), सूरज सदाशिव कांबळे (33, सिद्धार्थनगर), गौरव ऊर्फ ठोंब्या शाहू चोपडे (22, सिद्धार्थनगर), इक्बाल ऊर्फ अब्दुल सिकंदर महात (35, राजेबागस्वार, शनिवार पेठ), आसिफ अब्दुल शेख (34, राजेबागस्वार) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. पाचही संशयितांना न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे. दंगलप्रकरणी दोन्हीही गटांतील चारशे संशयितांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.