Shooting case | पूर्ववैमनस्यातून गुंडावर गोळीबार केल्याप्रकरणी दोघांना अटक 
कोल्हापूर

Shooting case | पूर्ववैमनस्यातून गुंडावर गोळीबार केल्याप्रकरणी दोघांना अटक

हल्लेखोर इचलकरंजीचे; चार दिवसांची पोलिस कोठडी

पुढारी वृत्तसेवा

इचलकरंजी : पूर्ववैमनस्यातून रेकॉर्डवरील गुन्हेगार ओमकार जितेंद्र कांबळे (22, रा. समता चौक, सांगलवाडी) याच्यावर भर रस्त्यात गोळी झाडल्या प्रकरणी अनुराग अमोल सूर्यवंशी (20, रा. शिकलगार हाऊस, पुजारी मळा, इचलकरंजी) व ओमकार संजय शेंडे (रा. यशवंत कॉलनी इचलकरंजी) या दोघा संशयितांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने शहरातील पंचगंगा नदीघाट परिसरात पकडले. दोघाही संशयितांना चार दिवसांची पोलिस कोठडी न्यायालयाने सुनावली आहे. याची माहिती पो.नि. महेश चव्हाण यांनी दिली.

हल्ल्याप्रकरणी कौस्तुभ निखिल गोंधळे (20, रा. सिद्धार्थ परिसर सांगली) याने फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी अनुराग सूर्यवंशी व ओमकार शेंडे यांचा शोध सुरू केला होता. पोलिस अंमलदार वैभव पाटील यांना अनुराग व ओमकार हे दोघेही संशयित पंचगंगा नदी रेणुका मंदिर परिसरात असल्याची माहिती मिळाल्यानंतर पथकाने त्यांना तेथून ताब्यात घेतले. त्यांच्याकडे केलेल्या चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे. त्यांना गावभाग पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. दोघाही संशयितांना न्यायालयासमोर हजर करण्यात आले. ही कारवाई पो.नि. सुशांत चव्हाण, सपोनि सागर वाघ, पोलिस अंमलदार वैभव पाटील, गजानन गुरव यांच्या पथकाने केली.

हल्ल्यानंतर ढाब्यावर जेवणावर मारला ताव?

ओमकार कांबळे याच्यावर गोळी झाडल्यानंतर हल्लेखोरांनी एका ढाब्यावर जेवणावर ताव मारल्याची चर्चा रंगली होती. त्यांच्या चेहर्‍यावर हल्ल्याबाबत पश्चात्तापाचा कोणताही लवलेश दिसून येत नव्हता. रात्री मध्यस्थामार्फत पोलिसांकडे संशयित हजर झाल्याचीही चर्चा होती. त्यामुळे संशयितांना हजर करणारा मध्यस्थ कोण, याबाबतही चर्चा रंगली होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT