कोल्हापूर

‘शिवपुत्र संभाजी’साठी भव्य रंगमंच; शाळांसाठी ग्रुप बुकिंगला विशेष सवलत

दिनेश चोरगे

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा :  येथे 'शिवपुत्र संभाजी' या महानाट्याचे आयोजन 7 एप्रिल ते 12 एप्रिलदरम्यान करण्यात आले आहे. तपोवन मैदान, कळंबा रोड, येथे होणार्‍या प्रयोगांसाठी भव्य रंगमंच उभारणीला सुरुवात झाली असून, बुकिंगला चांगला प्रतिसाद मिळत आहे, अशी माहिती प्रमुख अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांनी दिली.

महानाट्यासाठी 120 फुटी तीन मजली रंगमंच उभारला जात आहे. याच भव्य रंगमंचावर महानाट्याची भव्यता कोल्हापूरकरांना अनुभवता येईल. बंदिस्त नाटकांच्या तुलनेत अतिशय कमी दरात उपलब्ध होणारे हे महानाट्य पाहण्यासाठी सहकुटुंब हजेरी लावावी, असे आवाहन डॉ. अमोल कोल्हे यांनी केले.

डॉ. अमोल कोल्हे यांची प्रेक्षकांमधून चित्तथरारक घोडेस्वारी, तडाखेबाज संवाद, 22 फुटी जहाजावरील जंजिरा मोहीम हे या प्रयोगाचे आकर्षण आहे. छत्रपती संभाजीराजांना जवळून पाहिल्याचा आनंद अगदी शेवटी बसलेल्या प्रेक्षकांनादेखील मिळेल, असे डॉ. कोल्हे म्हणाले.

तिकीट विक्री केशवराव भोसले नाट्यगृह, हॉटेल विश्व-शाहूपुरी पहिली गल्ली, कुलकर्णी आयुर्वेद शहाजी लॉ कॉलेजसमोर, राजारामपुरी, हॉटेल दामिनी-ताराबाई पार्क आणि तपोवन मैदान, कळंबा रोड येथे सुरू आहे. 'बुक माय शो'वर देखील तिकीट उपलब्ध आहेत.

स्थानिक कलाकारांना संधी

या महानाट्यात काम करण्याची संधी स्थानिक कलाकारांना देण्यात येणार आहे. त्यासाठीची ऑडिशन बुधवार, दि. 29 मार्चपासून सुरू झाली आहे. ऑडिशनसाठी संपर्क : 9673722844, 9975264772.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT