Shivaji University 
कोल्हापूर

Kolhapur Shivaji University| संशोधन, नवोपक्रमातून शिवाजी विद्यापीठ जागतिक ज्ञाननकाशावर झळकणार!

कुलगुरू प्रा. डॉ. आर. के. कामत यांचा मानस; भविष्यातील विद्यापीठाची मांडली संकल्पना

पुढारी वृत्तसेवा

प्रवीण मस्के

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाने परंपरेचा वारसा जपत संशोधन, नवोपक्रम व आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून जागतिक ज्ञाननकाशावर ठळक स्थान निर्माण करण्याचे ध्येय ठेवले आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता, क्वांटम संगणन, सेमीकंडक्टर, जैवतंत्रज्ञान आणि हरित ऊर्जा या क्षेत्रांत विद्यार्थ्यांना सक्षम करून ग्रामीण विद्यार्थ्यांनाही जागतिक संधी उपलब्ध करून देणार असल्याचा मानस कुलगुरू प्रा. डॉ. आर. के. कामत यांनी व्यक्त केला.

शिवाजी विद्यापीठाच्या ६४ व्या वर्धापन दिनानिमित्त त्यांनी ‘उद्याच्या क्षितिजाकडे : शिवाजी विद्यापीठ’ या संकल्पनेतून भविष्यातील विद्यापीठाची दिशा मांडली. मायमराठीतून डिजिटल मार्गदर्शन, जागतिक प्रयोगशाळांशी ग्रामीण विद्यार्थ्यांची जोडणी व अनुभवाधारित शिक्षणावर भर देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. ऊस, दूध, फाैंड्री व वस्त्रोद्योगाला संशोधनाची जोड देतानाच ड्रोन आणि उपग्रहांच्या मदतीने शेती व पूरनियोजन अधिक सक्षम करण्याचे उद्दिष्ट असणार आहे. ‘कोल्हापुरी चिप’ ही नव्या तंत्रज्ञानातील ओळख निर्माण करण्याची आकांक्षाही त्यांनी व्यक्त केली.

विद्यार्थ्यांच्या कल्पनांना प्रयोगशाळा, इन्क्युबेशन केंद्रे व उद्योगांच्या माध्यमातून प्रत्यक्ष उत्पादन व रोजगारनिर्मितीपर्यंत नेण्यावर भर राहणार आहे. समता, संवेदनशीलता, नैतिकता आणि पर्यावरणपूरक विकास यांची सांगड घालत ज्ञानाचा प्रकाश शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविणे, हेच विद्यापीठाचे भविष्यातील ध्येय असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT