Shivaji Vidyapeeth | शिवाजी विद्यापीठ कुलगुरू पद; मुंबईत आजपासून पात्र उमेदवारांच्या मुलाखती Pudhari Photo
कोल्हापूर

Shivaji Vidyapeeth | शिवाजी विद्यापीठ कुलगुरू पद; मुंबईत आजपासून पात्र उमेदवारांच्या मुलाखती

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या कुलगुरू पदाची निवड प्रक्रिया सुरू असून, अर्ज छाननीतून पात्र ठरलेल्या उमेदवारांच्या 3 व 4 एप्रिल रोजी मुंबईत कुलगुरू शोध निवड समिती समोर मुलाखती होणार आहेत. कुलगुरू पदासाठी देशभरातून सुमारे 20 ते 25 जण शर्यतीत आहेत.

तत्कालीन कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांचा पाच वर्षांचा कार्यकाल 6 ऑक्टोबर 2025 रोजी पूर्ण झाला. त्यानंतर कुलगुरू निवड समिती तीन सदस्यांपैकी एकाच सदस्याची निवड करण्यात आली. पुण्याच्या सावित्रीबाई फुले विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांच्याकडे सध्या शिवाजी विद्यापीठाच्या कुलगुरूपदाचा प्रभारी कार्यभार आहे. कुलपती कार्यालयाने राबविलेल्या अर्ज प्रक्रियेत कुलगुरू पदासाठी राज्यभरातून 115 जणांचे अर्ज आले. अर्जांची छाननी होऊन 20 ते 25 पात्र उमेदवारांची यादी तयार झाली आहे.

यात शिवाजी विद्यापीठाच्या प्रभारी प्र- कुलगुरू डॉ. ज्योती जाधव, डॉ. होमीभाभा राज्य विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. आर. के. कामत, माजी प्र-कुलगुरू डॉ. पी. एस. पाटील, एसएनडीटी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, रसायनशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. एस. एस. चव्हाण, वाणिज्य आणि व्यवस्थापन विभागाचे डॉ. श्रीकृष्ण महाजन, पदार्थविज्ञान विभागप्रमुख डॉ. आर. जी. सोनकवडे, पुणे विद्यापीठातील डॉ. संजय ढोले, दिल्ली विद्यापीठातील डॉ. विलास खरात यांच्यासह डॉ. राजेंद्र देशमुख, डॉ. सतीश पाटील, डॉ. नितीन देसाई, डॉ. विजय खरे, डॉ. स्मिता देशमुख, डॉ. राजेश गच्चे, राजेंद्र काकडे यांचा समावेश आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT