Shivaji University Pudhari
कोल्हापूर

Shivaji University | शिवाजी विद्यापीठ कुलगुरूपदासाठी पात्र उमेदवारांच्या 3, 4 एप्रिलला मुंबईत मुलाखती

115 अर्जांमधून छाननी होऊन 20 ते 25 जणांची यादी तयार

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या कुलगुरूपदासाठीची निवड प्रक्रिया सुरू आहे. राज्यभरातून आलेल्या 115 अर्जांमधून छाननी होऊन 20 ते 25 जणांची यादी तयार करण्यात आली आहे. त्यांच्या 3 व 4 एप्रिल रोजी मुंबईत कुलगुरू शोध निवड समिती समोर मुलाखती होणार आहेत. यात शिवाजी विद्यापीठाच्या प्रभारी प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव, डॉ. श्रीकृष्ण महाजन यांच्यासह विद्यापीठातील काही जणांचा समावेश आहे.

कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांचा पाच वर्षांचा कार्यकाल 6 ऑक्टोबर 2025 रोजी पूर्ण झाला. त्यांचा कार्यकाल संपण्यापूर्वी नूतन कुलगुरूची निवड होणे अपेक्षित होते. त्यानंतर कुलगुरू निवड समिती तीन सदस्यांपैकी एकाच सदस्याची निवड करण्यात आली. सध्या पुण्याच्या सावित्रीबाई फुले विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांच्याकडे शिवाजी विद्यापीठाच्या कुलगुरूपदाचा प्रभारी कार्यभार आहे. कुलपती कार्यालयाने कुलगुरूपदासाठी 23 डिसेंबर ते 27 जानेवारी या कालावधीत अर्ज मागवले होते. भरतियार विद्यापीठ, कोईम्बतूर येथील गणित विभागाचे प्रा. एस. सरवनन यांची नोडल ऑफिसर आहेत.

राज्यभरातून 115 जणांचे कुलगुरूपदासाठी अर्ज आले होते. अर्जांची छाननी 9 व 10 फेब—ुवारी दरम्यान करण्यात आली. त्यानंतर पात्र उमेदवारांची यादी जाहीर झाली. त्यावर हरकतीची प्रक्रिया होऊन 20 ते 25 पात्र उमेदवारांची यादी तयार करण्यात आली आहे. एप्रिल महिन्यात निवड समितीकडून मुलाखतीची प्रक्रिया पार पडेल. त्यातून पाच उमेदवारांची नावे अंतिम केली जातील. या पाच जणांमधून राज्यपाल मुलाखती घेऊन एकाची कुलगुरू म्हणून निवड करतील.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT