कोल्हापूर : केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या वतीने जाहीर केलेल्या राष्ट्रीय संस्थात्मक रँकिंग फ—ेमवर्क (एनआयआरएफ-2025) मध्ये शिवाजी विद्यापीठाने देशातील आघाडीच्या 200 विद्यापीठांमध्ये स्थान कायम राखले. राज्य सार्वजनिक विद्यापीठांच्या यादीत आगेकूच करीत देशातील आघाडीच्या 50 विद्यापीठांत स्थान प्राप्त केले, अशी माहिती प्र-कुलगुरू डॉ. पी. एस. पाटील यांनी दिली.
केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने गुरुवारी 2025 साठीची राष्ट्रीय संस्थात्मक रँकिंग फ—ेमवर्कची क्रमवारी जाहीर केली. शिवाजी विद्यापीठाने क्रमवारीत आणखी आगेकूच करीत 1-50 या रँकबँडमध्ये स्थान मिळवले. आघाडीच्या 50 विद्यापीठांत शिवाजी विद्यापीठ 51.80 गुणांकनासह 45 व्या स्थानी पोहोचले. यादीत 11 व्या स्थानी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, 12 व्या स्थानी मुंबई विद्यापीठ तर 43 व्या स्थानी पुण्याचे सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठ आहे.
क्रमवारीत सलग दहावेळा भारती विद्यापीठ कॉलेज ऑफ फार्मसीचा झेंडा
भारती विद्यापीठ कॉलेज ऑफ फार्मसी कोल्हापूरने ‘एनआयआरएफ’ इंडिया रँकिंग 2025 मध्ये देशात 78 वे, तर राज्यात 10 वे स्थान कायम ठेवले. ‘नॅशनल असेसमेंट अँड अॅक्रिडेशन कौन्सिल’ नॅकचे ‘ए प्लस’ व शिक्षण मंत्रालय भारत सरकारमार्फत जाहीर नॅशनल इन्स्टिट्युशनल रँकिग फेमवर्क (एनआयआरएफ) 2025 च्या राष्ट्रीय स्तरावर 78 वे स्थान पटकावले होते. क्रमवारीत महाविद्यालयाने सलग दहावेळा स्थान टिकवले, अशी माहिती प्राचार्य डॉ. एच. एन. मोरे यांनी दिली.