कोल्हापूर : शिवस्पंदन महोत्सवांतर्गत शिवाजी विद्यापीठात आयोजित शोभायात्रेत विविध महामानव व भारतीय संस्कृतीचे दर्शन घडविणाऱ्या पेहराव्यातील विद्यार्थी.  (छाया : अर्जुन टाकळकर)
कोल्हापूर

Shivspandan 2026 : शिवाजी विद्यापीठात शोभायात्रेने ‌‘शिवस्पंदन‌’ सुरू

शिवरायांसह शाहू महाराज, फुले दाम्पत्य, राजकपूर अवतरले; विद्यार्थ्यांचा प्रतिसाद

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास मंडळाच्यावतीने आयोजित तीन दिवसीय शिवस्पंदन सांस्कृतिक महोत्सवाला मंगळवारी आकर्षक व दिमाखदार शोभायात्रेने मोठ्या जल्लोषाच्या वातावरणात प्रारंभ झाला. महोत्सवात विद्यापीठाच्या विविध अधिविभागांतील विद्यार्थांनी उत्स्फूर्त सहभाग दर्शविला.

शिवाजी विद्यापीठात आयोजित शोभायात्रेत विविध महामानव व भारतीय संस्कृतीचे दर्शन घडविणाऱ्या पेहराव्यातील विद्यार्थी.

शोभायात्रेच्या निमित्ताने छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, यांच्यासह राजकपूर, नर्गीस, दादा कोंडके, उषा चव्हाण, व्ही. शांताराम आदी कलाकारांच्या व्यक्तीरेखा विद्यापीठाच्या प्रांगणात अवतरल्या. शेतकरी, महाराष्ट्राची लोकसंस्कृती, सण व परंपरा, भारताच्या विविध प्रांतांमधील नागरिकांच्या वेशभूषा, आजची मल्टिटास्किंग महिला इत्यादींचे दर्शन घडविले. विद्यार्थ्यांनी केवळ वेशभूषेवरच समाधान मानता शेतकरी आत्महत्या, पर्यावरणाचे संरक्षण, शिक्षण, मतदार जागृती व लोकशाही, वास्तव आणि आभासी जगातील फरक इत्यादींविषयीही सादरीकरण करून लक्ष वेधून घेतले. विद्यापीठात शिकणाऱ्या परदेशी विद्यार्थ्यांनीही शोभायात्रेत आवर्जून सहभाग घेतला.

विद्यापीठाच्या प्रांगणातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करून शोभायात्रेस प्रारंभ करण्यात आला. कुलसचिव डॉ. व्ही.एन. शिंदे, डॉ. प्रल्हाद माने, डॉ. मीना पोतदार यांच्या प्रमुख उपस्थितीत शोभायात्रेचे उद्घाटन करण्यात आले. मुख्य इमारतीपासून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास प्रदक्षिणा घालून हलगी व ढोलताशाच्या गजरात शोभायात्रा काढण्यात आली. मुख्य इमारतीसमोर सहभागी संघांनी आपापल्या विषयाच्या अनुषंगाने अत्यंत देखणे सादरीकरण केले.

शोभायात्रेनंतर विद्यापीठाच्या राजर्षी शाहू सभागृहात शिवस्पंदन महोत्सवाचे प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव यांच्या हस्ते उद्घाटन झाले. डॉ. तानाजी चौगुले यांनी प्रास्ताविक केले. डॉ. प्रमोद कसबे यांनी सूत्रसंचालन केले. समन्वयक डॉ. प्रल्हाद माने यांनी आभार मानले. यावेळी डॉ. मदनलाल शर्मा, संग््रााम भालकर, सुरेखा अडके आदी उपस्थित होते. बुधवारी (दि. 7) राजर्षी शाहू सभागृह येथे मूकनाट्य, नकला व लघुनाटिका स्पर्धा होतील.

सर्वच स्पर्धांना उत्तम प्रतिसाद

उद्घाटन समारंभानंतर राजर्षी शाहू सभागृहात दिवसभर सुगम गायन, एकल लोकवाद्य वादन, समूहगीत स्पर्धा आणि लोकवाद्य वादन ताल उत्सव झाला. त्याचप्रमाणे रांगोळी व स्थळचित्रण स्पर्धा संगीत व नाट्यशास्त्र अधिविभागात पार पडल्या. सर्वच स्पर्धांना विद्यार्थ्यांचा उत्तम प्रतिसाद लाभला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT