Shivaji University Pudhari File Photo
कोल्हापूर

Kolhapur News| दुष्काळग्रस्त १६ तालुक्यांतील विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्कमाफी

शिवाजी विद्यापीठाचा निर्णय

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : खरीप हंगामात २०२६ च्या ‘ट्रिगर-१’ (प्रथम कळ) अंतर्गत दुष्काळ जाहीर झालेल्या सांगली, सातारा व कोल्हापूर जिल्ह्यांतील १६ तालुक्यांमधील पात्र विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्कमाफीची सवलत देण्याचा निर्णय शिवाजी विद्यापीठाने घेतला आहे. याबाबत विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या संचालकांनी संबंधित महाविद्यालये व अधिविभागांना परिपत्रकाद्वारे सूचना दिल्या आहेत.

राज्यातील २६५ दुष्काळ जाहीर झालेल्या तालुक्यांतील रहिवासी व त्यांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्‍न एक लाख रुपयांपर्यंत असलेल्या पात्र विद्यार्थ्यांना सवलतीचा लाभ मिळेल. यात कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा, राधानगरी, गगनबावडा, भुदरगड, आजरा व चंदगड तर सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळ, मिरज, आटपाडी व जत तर सातारा जिल्ह्यातील सातारा, खटाव, माण, फलटण, खंडाळा व महाबळेश्वर या तालुक्यांचा समावेश आहे.

प्रस्ताव सादर करणे आवश्यक

संबंधित तालुक्यांतील पात्र विद्यार्थ्यांनी आधी परीक्षा शुल्क भरले असल्यास, शुल्क प्रतिपूर्तीसाठी आवश्यक कागदपत्रांसह प्रस्ताव सादर करणे आवश्यक आहे. सांगली जिल्ह्यासाठी १२ ऑक्टोबर तर सातारा व कोल्हापूर जिल्ह्यांसाठी १३ ऑक्टोबरपर्यंत प्रस्ताव सादर करण्याची मुदत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT