कोल्हापूर : शिवाजी तरुण मंडळाने केएसए लीग स्पर्धेचा चषक व दीड लाखाच्या बक्षिसाचा धनादेश कोल्हापूर स्पोर्टस् असोसिएशनच्या कार्यालयात परत करत निषेध नोंदविला.  
कोल्हापूर

kolhapur | शिवाजी तरुण मंडळाने केएसए लीग चषकासह बक्षीस रक्कम केली परत

पंचांच्या चुका, पक्षपाती निर्णयाची दखल न घेतल्याने निषेध

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : ‘राजेश चषक’ फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पंचांच्या चुकीच्या आणि पक्षपाती निर्णयांमुळे संघावर अन्याय झाल्याने शिवाजी तरुण मंडळाने चंद्रकांत चषक फुटबॉल स्पर्धा न खेळण्याचा निर्णय घेतला होता. याला महिनाभराचा कालावधी लोटला तरी केएसएकडून याबाबत कोणतीही कारवाई झाली नव्हती. केएसएच्या या दुर्लक्षाचा निषेध म्हणून शिवाजी तरुण मंडळाने केएसए फुटबॉल लीग स्पर्धेच्या विजेतेपदाच्या चषकासह दीड लाख रुपयांच्या बक्षीसाच्या रक्कमेचा धनादेश केएसएच्या कार्यालयाला परत करत निषेध नोंदविला.

राजेश चषक फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पंच व मॅच कमिशनर यांच्यासमोर विरोधी संघाच्या बेंचवरून शिवीगाळ करून पंचांच्या अंगावर धावून जाण्याचे प्रकार घडले. मात्र, यावर कोणतीही कारवाई झाली नाही. तसेच दबाव टाकूण खेळाडूचे मानसिकद़ृष्ट्या खच्चीकरण केले. प्रकरणाची सखोल चौकशी करून न्याय मिळावा, अशी मागणी शिवाजी मंडळाकडून करण्यात आली होती.

अन्यायाबाबत न्याय मिळाला नाही

संघावर झालेल्या अन्यायाबाबत वारंवार पाठपुरावा करूनही न्याय मिळाला नाही. संघाला केएसने दिलेली वागणूक खेदाची आहे. याचा निषेध म्हणून चषक व बक्षीस रकमेचा धनादेश केएसएचे कर्मचारी अमर पवार यांच्याकडे देण्यात आला. या संदर्भातील पत्रावर शिवाजी तरुण मंडळाचे अध्यक्ष सुजित चव्हाण, सचिव महेश जाधव, संचालक अजित खराडे, फुटबॉल कमिटी अध्यक्ष विशाल बोंगाळे, व्यवस्थापक शिवतेज खराडे, बॉबी मोरे यांच्यासह मंडळाच्या सदस्यांच्या स्वाक्षरी आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT