Shiv Jayanti  
कोल्हापूर

Shiv Jayanti : जल्लोषी वातावरण, शिवरायांचा अखंड जयघोष

शिवाजी तरुण मंडळाच्या मिरवणुकीत सळसळता उत्साह; साऊंड सिस्टीमसह पारंपरिक वाद्यांचा मिलाप

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता जिजाऊ यांच्यासह मावळ्यांचा वेश धारण केलेली मुलं, लयबद्ध तालात हलगीचा ठेका, ज्येष्ठ नागरिकांचे लेझीम पथक, वारकऱ्यांची दिंडी, आकर्षक विद्युत रोषणाई, सामाजिक संदेश देणारे फलक, लाठीकाठीची प्रात्यक्षिके, तुतारीचा निनाद आणि मुखी ‌‘छत्रपती शिवाजी महाराज की जय‌’ असा अखंड जयघोष, अशा जोशपूर्ण वातावरणात गुरुवारी शिवाजी तरुण मंडळाची शिवजयंती मिरवणूक उत्साहात पार पडली.

शिवाजी पेठेतील शिवाजी तरुण मंडळातर्फे शिवजयंतीनिमित्त पाच दिवसांपासून सांस्कृतिक कार्यक्रमांसह विविध उपक्रम राबविले जात आहे. गुरुवारी सकाळी 10 वाजता शिवजन्मकाळ सोहळा झाला. सायंकाळी भव्य मिरवणूक काढण्यात आली. उभा मारुती चौक येथे खासदार शाहू महाराज यांच्या हस्ते मिरवणुकीस सुरुवात झाली. यावेळी महापौर रूपाराणी निकम, आ. सतेज पाटील, आ. चंद्रदीप नरके, माजी आमदार मालोजीराजे यांची प्रमुख उपस्थित होती. निवृत्त चौक, बिनखांबी गणेश मंदिर, महाद्वार रोड, पापाची तिकटी, मनपा अशा शहरातील मुख्य मार्गावरून मिरवणूक काढली. धनगरी ढोलसह ज्येष्ठ नागरिकांचे लेझीम पथक, छत्रपतींची भव्य अश्वारूढ मूर्ती मिरवणुकीचे आकर्षण ठरले.

उपमहापौर अक्षय जरग, नगरसेवक इंद्रजित बोंद्रे, सुजित चव्हाण, महेश जाधव, अजित खराडे, अनिकेत सरनाईक, रवी साळोखे, सुहास साळोखे, उत्तम कोराणे, सचिन चव्हाण, माधुरी नकाते, अजय इंगवले, राजेश लाटकर, राहुल माने, चंद्रकांत यादव, लाला गायकवाड, संजय कुराडे यांच्यासह शहराच्या विविध भागांतील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT