Ingavale Manjit Mane Dispute | ठाकरे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख इंगवले यांची शहरप्रमुख मंजित मानेंना धमकी 
कोल्हापूर

Ingavale Manjit Mane Dispute | ठाकरे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख इंगवले यांची शहरप्रमुख मंजित मानेंना धमकी

मोबाईलवरील संभाषणाची क्लिप व्हॉटस्ॲ‌पवर व्हायरल

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : शिवसेना ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख रविकिरण इंगवले यांनी कोल्हापूर शहरप्रमुख मंजित माने यांना तू उद्या सकाळी उजडून दाखव, अशी फोनवरून धमकी दिली. तुझ्या अरूण दुधवडकर यांना फोन सांग, असा इशाराही दिला. दोघांत संभाषण झालेली खळबळजनक ऑडीओ क्लिप सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली असून, ठाकरे सेनेतील वाद चव्हाट्यावर आला आहे.

तू माझ्याकडून वाचणार नाहीस...

इंगवले यांनी माने यांना फोन करून सुनील जोशींना तुम्ही इंगवलेंची माणसं असं का म्हणता? अशी विचारणा केली. त्यावर माने यांनी मी तसे म्हटले नसल्याचे सांगून त्यांना कॉन्फरन्स कॉलवर घेण्यास सांगितले. त्यावर इंगवले, मी तुझा कामगार नाही असे म्हटले. तसेच तुझ्या दारात पाच मिनिटांत येतो, असे आ‍व्हान दिले. त्यावर माने यांनीही या मी बाहेर आहे, दहा मिनिटांत पोहोचतो, असे प्रतिआव्हान दिले. इंगवले यांनी, तू बालगोपाल, खंडोबा तालमीकडून वाचलाच... माझ्याकडून वाचणार नाहीस! अशी धमकी मानेंना दिली. त्यावर मानेंनी इंगवले यांना वाचायचा संबंधच नाही, असे सुनावले.

उद्या सकाळी ट्रायल घे माझी...

इंगवले हे आरेतुरेची भाषा वापरत होते, तर त्यावर मानेंनी मी सरळ बोलतोय, तुम्ही पण सरळ बाेला असे सांगितले. पुन्हा इंगवले यांनी, तुझी माझी भविष्यात कधीतरी भेट होणारच आहे, मला तू पाहिजेच आहेस, असे आव्हान दिले. त्यावर मानेंनी भेट काय... मी रोज असतोयचं की तुमच्या तेथे? असे प्रतिआ‍व्हान दिले. त्यावर इंगवले यांनी ये मग... उद्या सकाळी ट्रायल घे माझी? असे आव्हान दिले. ऑडीओ क्लिपमुळे ठाकरे सेनेतील अंतर्गत गटबाजी आणि पदाधिकाऱ्यांतील वाद चव्हाट्यावर आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT