Bribery Case | शिंगणापूर उपसरपंच, तलाठ्याला लाच घेताना अटक 
कोल्हापूर

Bribery Case | शिंगणापूर उपसरपंच, तलाठ्याला लाच घेताना अटक

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : शिंगणापूर परिसरात खरेदी केलेल्या जमिनीच्या सातबारा उतार्‍यावर मालकीची नोंद घालण्यासाठी लाच स्वरूपात 5 हजार रुपयांची रक्कम स्वीकारणारा शिंगणापूरचा उपसरपंच दीपक सदाशिव कांबळे (43) व तलाठी इरफान दिलावर सनदी (41, लाईन बाजार, कोल्हापूर) यांना गुरुवारी सायंकाळी लाचलुचपत प्रतिबंध पथकाच्या सापळ्यात जेरबंद झाले. दोघांविरुद्ध करवीर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. रात्री उशिरा त्यांना अटक करण्यात आली. लाचलुचपत प्रतिबंध पथकाच्या उपअधीक्षक वैष्णवी पाटील यांच्यासह पथकाने ही कारवाई केली.

तक्रारदार व्यक्तीने शिंगणापूर परिसरात नव्याने जागेची खरेदी केली आहे. सातबारा उतार्‍यावर वडिलांच्या नावाची नोंद करण्यासाठी त्यांनी तलाठी कार्यालयाकडे अर्ज केला होता. सनदी याने उपसरपंच कांबळे याला मध्यस्थी घालून लाच स्वरूपात 10 हजाराची मागणी केली. तडजोडीअंती 5 हजारावर सौदा ठरला व गुरुवारी सायंकाळी तलाठी कार्यालयात सनदीच्या वतीने उपसरपंच कांबळे याने तक्रारदाराकडून 5 हजाराची रक्कम स्वीकारताना त्यास रंगेहाथ पकडले. तलाठी कार्यालयातील टेबलच्या ड्रॉवरमधून लाचेची रक्कमही हस्तगत केली.

आज न्यायालयात हजर करणार

दोघांकडील मोबाईलही हस्तगत करण्यात आले. रात्री उशिरा संशयिताच्या घराचीही झडती घेण्यात आली. जेरबंद संशयितांना शुक्रवारी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT