ZP Panchayat samiti election  File Photo
कोल्हापूर

Sharad Pawar NCP: जिल्हा परिषदेसाठी घड्याळ चिन्ह घ्या, शरद पवार राष्ट्रवादीच्या जिल्ह्यातील नेत्यांना आदेश

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी घड्याळ चिन्ह घेण्याच्या आदेशाने संभमावस्था

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग््रेास शरद पवार पक्ष व अजित पवार यांची राष्ट्रवादी एकत्र आल्याने शरद पवार राष्ट्रवादीच्या उमेदवारांना घड्याळ चिन्ह घेण्याचे आदेश राज्यातून राष्ट्रवादी काँग््रेास शरद पवार पक्षाच्या सर्व जिल्ह्यांतील पदाधिकाऱ्यांना देण्यात आला आहे. महाविकास आघाडीच्या जागा वाटपाच्या चर्चा सुरू असून, शरद पवार राष्ट्रवादीसाठी काही ठिकाणच्या जागा महाविकास आघाडीमध्ये सोडण्यात आल्या असताना हा आदेश आल्यामुळे महाविकास आघाडीच्या नेत्यांसह उमेदवारांमध्ये संभमावस्था निर्माण झाली आहे.

महानगरपालिकेच्या निवडणूक निकालानंतर राष्ट्रवादीच्या दोन्ही पक्षांच्या अस्तित्वाबद्दलच शंका उपस्थित करण्यात येऊ लागल्या होत्या. त्यामुळे जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादींनी एकत्र लढण्याबाबत गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरू होत्या. अखेर शरद पवार व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बैठकीत एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब केले.

दोन्ही राष्ट्रवादींच्या नेत्यांच्या या बैठका सुरू असतानाच जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी जिल्ह्या जिल्ह्यांमध्ये महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये जागावाटपाच्या चर्चा सुरू होत्या. काही ठिकाणी जागावाटपाच्या चर्चा पूर्ण होऊन शरद पवार यांच्या राष्ट्रवादीसाठी काही ठिकाणच्या जागा सोडण्यात आल्या आहेत. त्यांनी उमेदवारी अर्ज भरताना राष्ट्रवादी काँग््रेास शरद पवार पक्षाचा उल्लेखही केला आहे.

जर उमेदवारी अर्जावर राष्ट्रवादी काँग््रेास शरद पवार पक्षाचा उल्लेख करण्यात आला असेल, तर या पक्षाचे चिन्ह तुतारी आहे, असे असताना राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या उमेदवारांना घड्याळ चिन्ह घेण्यास सांगण्याचा आदेश पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी जिल्ह्यातील पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना देण्यास सुरुवात केली आहे. उमेदवारी अर्ज भरण्याचा बुधवारी (दि. 21) शेवटचा दिवस आहे. या पार्श्वभूमीवर पक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडून निवडणूक चिन्हाबाबत देण्यात आलेल्या आदेशामुळे हे उमेदवार महाविकास आघाडीचे समजायचे की महायुतीचे, याबद्दल गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT