संतोष बामणे
जयसिंगपूर : नुकतीच शक्तिपीठ महामार्गाच्या सुधारित आराखड्याला शासनाने मंजुरी दिली आहे. यात दिग्रज (ता. जि. वर्धा) ते बांदा (ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग) पर्यंत 856.76 कि. मी. चा मार्ग होणार असून, यात 13 जिल्ह्यांतील 40 तालुक्यांचा समावेश आहे. यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील 73 गावे, सांगलीतील 25 गावे, सातारा जिल्ह्यातील 16 गावे, सोलापूर जिल्ह्यातील 35 गावांचा समावेश होणार आहे. याशिवाय अनेक नद्यांवर पूल व डोंगर परिसरात घाट होणार आहेत.
शक्तिपीठ महामार्ग कोल्हापूर जिल्ह्यात वारणा नदी पार करून जुने पारगाव येथे प्रवेश करणार आहे. त्याचबरोबर करवीर, राधानगरी, भुदरगड, आजरा व चंदगड तालुक्यांतून इसापूर भागातून तो सिंधुदुर्ग जिल्ह्यात जाणार आहे. तर, सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातून सुरुवात होणारा मार्ग पलूस, कडेगाव, वाळवा तालुक्यांतून कोल्हापूर जिल्ह्यात येणार आहे. त्याचबरोबर सातारा जिल्ह्यातील म्हसवड भागातून हा मार्ग जात मायणीच्या पुढील बाजूस सांगलीतील खानापूर तालुक्यात प्रवेश करणार आहे. त्याचबरोबर धाराशिव जिल्ह्यातून सोलापूर जिल्ह्यात प्रवेश करीत बार्शी, माढा, माळशिरस या तालुक्यांतून तो सातारा जिल्ह्यात जाणार आहे.
शासनाने या मार्गाला नव्याने मंजुरी दिल्यापासून हा मार्ग कोणत्या गावातून जाणार याची प्रतीक्षा पश्चिम महाराष्ट्रातील शेतकरी व गावांना लागून राहिली होती. अखेर याचा अधिकृत गुगल नकाशा समोर आला आहे. प्रसिद्ध झालेल्या गुगल नकाशावरून प्रत्यक्षात गावांची नावे लक्षात आली असली, तरी काही गावांच्या हद्दीतून हा मार्ग जाणार असल्याने गावांची संख्या कमी-जास्त होण्याची शक्यता आहे.
सांगली-कोल्हापूर जिल्ह्यांतील शक्तिपीठ महामार्गात बायागत शेती बाधित झाल्याने शेतकरी व लोकप्रतिनिधींनी तीव्र लढा दिला. अखेर शासनाने ‘शक्तिपीठ’चे आरेखन बदलले आहे. त्यामुळे सातारा जिल्ह्यालाही ‘शक्तिपीठ’चा लाभ मिळाला आहे. यात सांगली, कोल्हापूर, सातारा, सोलापूर या भागातील शहरे व महामार्गापासून कोसो दूर असलेली दुर्लक्षित गावे शक्तिपीठ महामार्गाच्या हायवेवर येणार आहेत.
हातकणंगले तालुका : जुने पारगाव, नवे पारगाव.
पन्हाळा तालुका : वारणानगर, बहिरेवाडी, जाखले, पोहाळे.
करवीर तालुका : केर्ली-केर्ले (रत्नागिरी-नागपूर हायवे क्रॉस), पाडळी, निटवडे, शिंदेवाडी, खुपिरे, कोपार्डे, कुडित्रे, वाकरे, कोगे, कसबा बीड, बहिरेश्वर, गणेशवाडी, शिरोली दुमाला, हिरवडे दुमाला, सडोली दुमाला, भाटणवाडी, हसूर दुमाला.
राधानगरी तालुका : राशिवडे बु., चंदे, येळवडे, कोलवडे, वाघावडे, मोहाडे, कौलव, पिंपळवाडी, कुराडवाडी, तळाशी, तुरंबे, कपिलेश्वर, मालवे.
कागल तालुका : बोरवडे, उंदरवाडी.
भुदरगड तालुका : नाधवडे, कोनवडे, निळपण, दारवाड, म्हसवे, गारगोटी, आकुर्डे, पुष्पनगर, शेणगाव, सोनारवाडी, मडूर, करडवाडी, शेळोली, पडखंबे, सोनुर्ली, मेघोली.
आजरा तालुका : हरपवडे, पेरणोली, देवर्डे, वेळवट्टी, खानापूर, पोळगाव, एरंडोल, मसोली, देऊळवाडी.
चंदगड तालुका : बुजवडे, गवसे, कुरणी, बिजूर, कानूर बु., कानूर खु., पिळणी, झांबरे धरण, इसापूर.
सांगली जिल्हा : 25 गावे : ऐतवडे खुर्द, कुरळप, कुंडलवाडी, येलूर-इटकरे (एनएच 4 हायवे क्रॉस), तुजारपूर, नवे खेड, मसुचीवाडी, दुधोंडी, घोगाव, कुंडल (राखीव - सागरेश्वर अभयारण्य हद्दीतून), कुंभारगाव, देवराष्ट्रे, शिरगाव, भाळवणी, शेळाकबाव, आंबेगाव, नेवरी, हिंगनगडे, नागेवाडी, भाग्यनगर, वाळखड, भिकवडी बु., माहुली, भेंडवडे.
सिंधुदुर्ग जिल्हा : 11 गावे : मसुरे, केगद, बाबा धबधबा, कुंभवडे, उडेली, बनसोडे, असनिये, फुकेरी, झोळंबे, पडवे, पानवळ, बांदा ते गोवा राज्याची सीमा.
सातारा जिल्हा : 16 गावे : मायणी, कानकात्रे, कान्हरवाडी, आसगाववाडी, भुकलेवाडी, धाकणी, दिवाड, दीडवाघवाडी, वरकुटे, म्हसवड (म्हसवड शहराबाहेरून), भाटकी, खडकी, हवलदारवाडी, कर्खेळ, गारवाड, मगरवाडी.
सोलापूर जिल्हा : 33 गावे : तरंगफळ, चांदापुरी, निमगाव, वेळापूर, उगडेवाडी, बोंलाडे, मलखंबी, जम्बुद, नेवारे, नंडोरे, पेहे, बाडलकोट, करंकब, तुळशी, अरण, मोडनिंब, शेटफळ, रोपाळे, उपळाई बु., उपळाई खु. (माढा शहराबाहेरून), विठ्ठलवाडी, चव्हाणवाडी, घानोटे, तळवडे, इर्लेवाडी, वैराग, सर्जापूर, रातांजन, मुंगाशी, निंबळक, रुई (तुळजापूर-बार्शी मार्ग नागोबा चौक क्रॉस), गौडगाव, सुर्डी.