कोल्हापूर : शेतकर्यांचा विरोध असणार्या शक्तिपीठ महामार्गास अर्थसंकल्पावेळी मंजुरी दिल्याने या महामार्गाची नवी अलाईन्मेंट चर्चेत आली आहे. नव्या अलाईन्मेंटमुळे या महामार्गाची दिशा बदलण्यात आली आहे.
नवीन संभाव्य अलाईन्मेंटमध्ये कोल्हापूर व सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील काही गावांना वगळून या भागातील नव्या मार्गाने महामार्गाची दिशा बदलण्यात आली आहे. यामध्ये प्रस्तावीत नवीन अलाईन्मेंटनुसार पलूस तालुक्यातील देवराष्ट्रे, कुंभारगाव, कुंडल, घोगाव, मसुचीवाडी, जुने खेड, बोरगाव, तर वाळवा तालुक्यातील वाळवा, उरण, कामेरी, येडेनिपाणी, इटकरे, येलूर, कुरळप, ऐतवडे खुर्द, हातकणंगले तालुक्यातील पारगाव, पन्हाळा तालुक्यातील बहिरेवाडी, जाखले, गिरोली, पोहाळे तर्फ आळते, कुशिरे, मनपाडळे (ता. हातकणंगले), करवीर तालुक्यातील केर्ली, केर्ले, वरणगे, पाडळी बु., शिंदेवाडी, खुपीरे, वाकरे, कुडित्रे, बहिरेश्वर, बीड, गणेशवाडी, शिरोली दु., सडोली दु., भाटणवाडी, हसूर. तर राधानगरी तालुक्यातील राशिवडे बु., कोदवडे, वाघवडे, मोहाडे, माजगाव, तळाशी, तुरंबे, कपिलेश्वर, सरवडे. कागल तालुक्यातील उंदरवाडी. भुदरगड तालुक्यातील खापरेवाडी, टिकेवाडी, नाधवडे, पाचवडे, बसरेवाडी, मिणचे खु., लोटेवाडी, कोळवण, पालेवाडी, भाटिवडे, हेदवडे, देवकेवाडी, शेणगाव, कराडवाडी, शेळोली, पडखंबे, सोनुले, मेघोली, अरळगुंडी. आजरा तालुक्यातील कोरीवडे, हरपवडे, पेरनोली, देवार्डे, वेळवट्टी, पेठेवाडी, मासोळी, खानापूर, पोळगाव, एरंडोल, सातेवडी. चंदगड तालुक्यातील गवसे, भुजवडे, कुर्णी, म्हाळुंगे, बिजूर, भोगोली, कानूर बु. पिलानी, जांब—े, इसापूर. दोडामार्ग तालुक्यातील कुंभवडे, भेकुर्ली, कोळझर, झोळंबे आणि सावंतवाडी तालुक्यातील पडवे माजगाव, पडवे, देगाव आणि बांदा या गावांतून नव्याने अलाईन्मेंट होण्याची शक्यता आहे.