Drought Crisis | दुष्काळदाह  
कोल्हापूर

Kolhapur Shahuwadi | शाहूवाडी तालुक्यात अपात्र ठरलेल्या दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांवर अन्याय; कागदपत्रे उशिरा मिळाल्याने मदतीपासून वंचित

शाहूवाडी तालुक्यात अपात्र ठरलेल्या दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांवर अन्याय; कागदपत्रे उशिरा मिळाल्याने मदतीपासून वंचित

पुढारी वृत्तसेवा

​बांबवडे (शाहूवाडी) : सरकारच्या दुष्काळ मदत वाटपात कागदपत्रे वेळेत सादर करू न शकल्यामुळे पात्र असूनही शाहूवाडी तालुक्यातील अनेक शेतकरी शासकीय मदतीपासून वंचित राहिले आहेत. ऐन संकटकाळात कागदपत्रांच्या तांत्रिक अडचणींमुळे मदत न मिळाल्याने शेतकऱ्यांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. प्रशासनाने या सर्व अपात्र शेतकऱ्यांचा फेरसर्व्हे करून त्यांना तातडीने मदतीचा लाभ द्यावा, अशी जोरदार मागणी होत आहे.

शाहूवाडी तालुक्यात दुष्काळग्रस्त शेतकरी वर्गाचे प्रशासनाकडून पंचनामे करण्यात आले होते. त्यांना सरकारची रु. ५००० ची मदत प्राप्त झाली. परंतु, याचवेळी मुदतीत आवश्यक कागदपत्रे किंवा पुरावे सादर न करू शकल्यामुळे अनेक गरीब व खऱ्या अर्थाने पात्र शेतकरी यादीतून बाहेर पडले. केवळ तांत्रिक कारणांमुळे हे शेतकरी सरकारच्या आर्थिक मदतीपासून पूर्णपणे वंचित राहिले आहेत.

​"आम्ही सर्व अटी पूर्ण करत असताना केवळ कागदपत्रे वेळेत जमा न झाल्यामुळे आम्हाला मदतीपासून डावलले गेले आहे. सरकारने आमच्या परिस्थितीचा सहानुभूतीपूर्वक विचार करून विशेष बाब म्हणून फेरसर्व्हे करावा आणि न्याय द्यावा," अशी आर्त हाक या वंचित शेतकरी वर्गातून दिली जात आहे.

​सध्याच्या बिकट परिस्थितीतून सावरण्यासाठी प्रशासनाने या प्रकरणात तातडीने लक्ष घालून फेरसर्वेक्षणाचे आदेश द्यावेत, अशी मागणी शाहूवाडी तालुक्यातील शेतकऱ्यांमधून होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT