kolhapur Crime News | अल्पवयीन मुलीवर अत्याचार; कसबा बावडा येथील तरुणास अटक  
कोल्हापूर

kolhapur Crime News | अल्पवयीन मुलीवर अत्याचार; कसबा बावडा येथील तरुणास अटक

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : अल्पवयीन मुलीस लग्नाचे अमिष दाखवून अत्याचार केल्याप्रकरणी शाहूपुरी पोलिसांनी तरुणास अटक केली. रोहित विजय लोंढे (वय २५, रा. लाईन बाजार, कसबा बावडा) असे संशयिताचे नाव आहे. याबाबतची फिर्याद पीडितेच्या आईने शुक्रवारी शाहूपुरी पोलिस ठाण्यात दिली. नोव्हेंबर २०२५ ते गुरुवार (दि. २) दरम्यान ही अत्याचाराची घटना घडली.

रोहित लोंढे याची एका अल्पवयीन मुलीसोबत ओळख झाली होती. या ओळखीतून त्या मुलीस लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार केले. गेल्या सात महिन्यांपासून हा प्रकार सुरू होता. यातून पीडिता चार महिन्यांची गर्भवती राहिली. पीडितेच्या आईने याबाबतची तक्रार शाहूपुरी पोलिस ठाण्यात दिली. यानुसार शुक्रवारी सायंकाळी रोहितला पोलिसांनी अटक केली. पुढील तपास पोलिस निरीक्षक संतोष डोके करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT