शाहू जन्मस्थळ संग्रहालयाचा लोकार्पण सोहळा होणार ‌‘लोकोत्सव‌’  
कोल्हापूर

Kolhapur News : शाहू जन्मस्थळ संग्रहालयाचा लोकार्पण सोहळा होणार ‌‘लोकोत्सव‌’

सर्वपक्षीय बैठकीत निर्धार : दसरा चौक ते शाहू जन्मस्थळ शाहू समता ज्योत रॅली काढणार

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : कसबा बावडा येथील शाहू जन्मस्थळ संग््राहालयाचे शनिवारी (दि. 21) होणारा लोकार्पण सोहाळा लोकोत्सव म्हणून साजरा करण्याचा निर्धार सर्व पक्षीय बैठकीत करण्यात आला. दसरा चौक ते शाहू जन्मस्थळ शाहू समता ज्योत रॅली काढण्याचा निर्णयही यावेळी घेण्यात आला.

राजर्षी शाहू जन्मस्थळ वस्तुसंग््राहालय लोकार्पण सोहळा कोल्हापूरच्या परंपरेला शोभेसा दिमाखदार व्हावा. तसेच, सर्व समावेशक सहभागासाठी मंगळवारी (दि. 17) राजर्षी शाहू समाधिस्थळ, नर्सरी बाग येथे शाहू प्रेमींसह विविध समाज, तालीम संस्था व सर्वपक्षीय यांची बैठक झाली.

मराठा महासंघाचे वसंतराव मुळीक म्हणाले, तब्बल 18 वर्षांनी शाहू जन्मस्थळ वस्तुसंग््राहालयाचे काम पूर्ण झाले असून, शनिवारी (दि. 21) लोकार्पण होत आहे. हा कार्यक्रम राजर्षी शाहू महाराज यांच्या कार्याला साजेसा झाला पाहिजे. या दिवशी दसरा चौक ते शाहू जन्मस्थळ समता ज्योत रॅली काढली जाणार आहे. दसरा चौक राजर्षी शाहू महाराज पुतळा येथे दुपारी 3 वाजता ज्योत प्रज्वलित करून दुचाकी, चारचाकीने रॅलीला सुरुवात होईल. यामध्ये शाहूंच्या जीवनावरील चित्ररथ, पोवाडा, लघुपटांचा समावेश असेल. शाहूप्रेमी, सामाजिक संघटना, वसतिगृह, संस्थांचे प्रतिनिधी, खेळाडूंनी यामध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावे.

इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत म्हणाले, शाहू जन्मस्थळ येथील कामे चांगली झाली असून, केवळ तीन तासात शाहू महाराजांचे जीवन चरित्र समजते. आणखीन काही कामे करावयाची असल्यास तेही पुढील काळात प्रशासनाकडून करून घेतली जातील. यावेळी बबन रानगे, माजी नगरसेवक अशोक भंडारी, व्यंकाप्पा भोसले, शाहीर दिलीप सावंत, अमरसिंह जगदाळे, आनंद म्हाळुंगेकर, हसन देसाई, बाबुराव बोडके, कॉ. दिलीप पवार, टी. एस. कांबळे, डी. जी. भास्कर, शैलजा भोसले, गीता हासूरकर, सीमा पाटील, सुनीता पाटील, सुभाष देसाई, शशिकांत पाटील, माजी महापौर आर. के. पोवार, सरिता सासणे, कादर मलबारी, रघुनाथ कांबळे, शुभम शिरहट्टी, दयानंद कांबळे, पुरातत्त्व विभागाचे अधिकारी उदय सुर्वे यांनी मनोगत व्यक्त केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT