कोल्हापूर : येथील पद्माराजे गर्ल्स स्कूलमध्ये राजर्षी शाहू महाराज जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले.
कु. अवनी आवळे हिने शाहू राजांविषयी माहिती सांगितली. पर्यवेक्षिका एस. एस. इनामदार यांनी शाहू महाराजांनी कोल्हापुरात केलेला विकास, बहुजन समाजाच्या उद्धारासाठी केलेले प्रयत्न तसेच कुस्ती सारख्या खेळाचा विकास करण्यासाठी केलेले प्रयत्न, याविषयी माहिती सांगितली. मुख्याध्यापिका सौ. एस. आर. पाटील यांनी शाहू महाराजांनी केलेल्या शैक्षणिक कार्याविषयी माहिती सांगितली.
'लोकांचा राजा' या वि. स. खांडेकर यांच्या पुस्तकाचे अभिवाचन प्रशालेची जी.एस. हर्षिता चव्हाण हिने केले. स्वागत, प्रास्ताविक, सूत्रसंचालन सौ. आर. पी. धुमाळ यांनी केले. आभार सौ.व्ही.वाय.देशपांडे यांनी मानले. कार्यक्रमास उपमुख्याध्यापक आर. जी. देशपांडे, पर्यवेक्षक ए.डी.भोई , सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थिनी उपस्थित होत्या.