शाहूंनी शंभर वर्षांपूर्वी धनगर-मराठा विवाह घडविला pudhari photo
कोल्हापूर

शाहूंनी शंभर वर्षांपूर्वी धनगर-मराठा विवाह घडविला

मराठ्यांना हाकेने शहाणपण शिकवू नये : सकल मराठा समाज

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी शंभर वर्षांपूर्वी धनगर- मराठा आंतरजातीय विवाहाची नुसती संकल्पना मांडली नाही तर आपल्या बहिणीचा विवाह होळकर घराण्यात करून नातेसंबंध जोडले. यामुळे हाकेनी मराठ्यांना शहाणपण शिकवू नये, असे सकल मराठा समाजाने पत्रकात म्हटले आहे.लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी शंभर वर्षांपूर्वी धनगर- मराठा आंतरजातीय विवाहाची नुसती संकल्पना मांडली नाही तर आपल्या बहिणीचा विवाह होळकर घराण्यात करून नातेसंबंध जोडले. यामुळे हाकेनी मराठ्यांना शहाणपण शिकवू नये, असे सकल मराठा समाजाने पत्रकात म्हटले आहे.

हाकेला पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांचाही विसर पडला आहे. राष्ट्राची प्रगती होण्यासाठी जातिअंताच्या लढा व आर्थिक उन्नती हा एकच उपाय आहे असे समजणारे राष्ट्रीयत्वाची संकल्पना घेऊन शाहू महाराजांनी सामाजिक समतेचा पाया आपल्या संस्थानात घातला. आजही सामाजिकद़ृष्ट्या सलोख्याची विण तुटू नये यासाठी कोल्हापूरकर नेहमीच अग्रेसर असतात. महाराष्ट्रात 12 बलुतेदार आणि मराठा यांच्यात तेढ निर्माण होऊन आपली राजकीय पोळी भाजण्यासाठी हाकेसारखे मुद्दाम वक्तव्य करून तेढ करीत आहेत, असेही पत्रकात म्हटले आहे.

सकल मराठा समाजाचे समन्वयक वसंतराव मुळीक, चंद्रकांत पाटील, शशिकांत पाटील, संजय जाधव, रूपेश पाटील, राजू सावंत, उमेश पोवार, दिलीप सावंत, राहुल इंगवले यांनी हे पत्रक प्रसिद्धीस दिले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT