Crime File Photo
कोल्हापूर

Stock investment harassment case | शेअर मार्केटिंग गुंतवणुकीतील रक्कम परत मागणार्‍या दोघांवर शरीरसुखाच्या मागणीची तक्रार

सावर्डेतील महिलेच्या फिर्यादीवरून बाचणीतील दोघांवर गुन्हा

पुढारी वृत्तसेवा

मुरगूड : ट्रेडिंगसाठी शेअर मार्केटमध्ये गुंतवलेले 25 लाख रुपये देण्याच्या कारणावरून सावर्डे बु. (ता. कागल) येथील महिलेला अश्लील भाषेत बोलून तिच्याकडे शरीरसुखाची मागणी केल्याच्या तक्रारीनुसार बाचणी (ता. कागल) येथील संदीप ज्ञानदेव पाटील आणि अजित दादू पाटील यांच्याविरुद्ध मुरगूड पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.

सावर्डे बुद्रुक (ता. कागल) येथील राहुल पाटील आणि त्यांचे मित्र सागर भीमराव पाटील हे ट्रेडिंगचे काम करीत होते. त्या कामामधून राहुल पाटील आणि बाचणी (ता. कागल) येथील संदीप ज्ञानदेव पाटील यांची ओळख झाली होती. या ओळखीतून संदीप पाटील याने राहुल पाटील यांना शेअर मार्केटमध्ये गुंतवण्यासाठी 25 लाख रुपये दिले आहेत. त्यातील काही रक्कम राहुल पाटील यांनी परत केली आहे व बाकीची शिल्लक रक्कम परत करावयाची आहे. संदीप पाटील याने राहुल पाटील भेटत नसल्यामुळे त्यांची पत्नी पूनम यांना फोनवर व समक्ष भेटून शिल्लक रकमेबाबत विचारणा करत होता.

याच कारणावरून 21 फेब—ुवारी 2026 रोजी सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास सावर्डे बु. (ता. कागल) येथील राहुल पाटील यांच्या घरी संदीप ज्ञानदेव पाटील व अजित दादू पाटील या दोघांनी पूनम पाटील या घरी एकट्याच असताना ‘तुझा नवरा आम्हाला भेटत नाही, तरी तू दोन दिवस आमच्याकडे मुक्कामाला चल,’ असे म्हणत अश्लील भाषेत शिवीगाळ केली. तसेच, तुझ्या नवर्‍याला बघून घेतो, अशी धमकी दिल्याची फिर्याद पूनम पाटील (रा. सावर्डे) यांनी मुरगूड पोलिसांत दिली असून, संदीप पाटील व अजित पाटील या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक ए. एस कुंडले यांच्या मार्गदर्शनाखाली मुरगूड पोलिस करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT