Illegal Abortion Case | गर्भलिंग निदान, गर्भपात प्रकरण; पेशंट पुरविणारा एजंट जेरबंद  
कोल्हापूर

Illegal Abortion Case | गर्भलिंग निदान, गर्भपात प्रकरण; पेशंट पुरविणारा एजंट जेरबंद

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : कोल्हापूरसह पश्चिम महाराष्ट्रात बहुचर्चित ठरलेल्या बेकायदा गर्भलिंग निदान आणि गर्भपातप्रकरणी मुख्य संशयित, निवृत्त सिव्हिल सर्जन डॉ. चंद्रकांत गुंडा गायकवाड याला पेशंट पुरविणाऱ्या एजंटाला करवीर पोलिसांनी शुक्रवारी अटक केली. किरण बापूसाहेब चव्हाण (वय २९, रा. आमजाई व्हरवडे, ता. राधानगरी) असे त्याचे नाव आहे. न्यायालयाने त्यास १२ ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी दिली आहे.

दरम्यान, डॉ. गायकवाडसह त्याचा मदतनीस शब्बीर हजारी यांच्या पोलिस कोठडीत वाढ झाली आहे. त्यांच्याकडून निष्पन्न झालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी सहा ते सात दाम्पत्यांकडे चौकशी करून त्याचे जबाब नोंदविले आहेत. किरण चव्हाणला ताब्यात घेतल्याने अटक झालेल्या एजंटांची संख्या सात झाली आहे.

किरण चव्हाण आमजाई व्हरवडे येथे शेती करतो. घसघशीत मिळणाऱ्या कमिशनमुळे त्याचे रॅकेटशी कनेक्शन आले. एका पेशंटमागे त्याला चार ते साडेचार हजाराचे कमिशन मिळत होते. गर्भलिंग निदानात स्त्रीभ्रूण असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर चव्हाण हा डॉ. गायकवाड याच्याकडे गर्भपात करण्यासाठी पेशंट पाठवित असल्याचेही चौकशीतून उघड झाले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT