Minor Girl Sexual Abuse (Pudhari File Photo)
कोल्हापूर

Minor Girl Sexual Abuse: सातवर्षीय बालिकेवर लैंगिक अत्याचार

कात्यायनी-गिरगावजवळ प्रकार; वडिलांकडे नेण्याच्या बहाण्याने उसाच्या शेतात नेत अतिप्रसंग

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : ‌ ‘बाळ चल, तुला वडिलांकडे सोडतो‌’, असे सांगत उसाच्या शेतात नेऊन सातवर्षीय चिमुरडीवर एका नराधमाने अतिप्रसंग केला. रविवारी दुपारी दोनच्या सुमारास कात्यायनी- गिरगाव रोडवर ही घटना घडली. या चिमुरडीवर सीपीआर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेने सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे.

पीडित बालिका पाचगाव परिसरात राहात

असून घरातील सर्वजण कात्यायनी रोडवरील एका हॉलमध्ये विवाह समारंभासाठी गेले होते. घरात कोणी नसल्याचा फायदा घेत, हा नराधम घरी आला.फबाळ चल, तुला तुझ्या वडिलांकडे सोडतोफ, असे सांगत तिला सोबत घेतले. तेथून तो कात्यायनी-गिरगाव रोडवर आला. या ठिकाणी एका ऊसाच्या शेतात निर्जनस्थळी या चिमुरडीला नेत तिच्यावर अतिप्रसंग केला.

या घटनेने भेदरलेल्या चिमुरडीने आरडा ओरड करत रडायला सुरवात केली. त्यावर या नराधमाने तिच्याच फॉकचा तोंडात कापडी बोळा कोंबत, तिला मारहाण करत, अत्याचार सुरूच ठेवला. तरीही ती रडतच राहिल्याने त्या नराधमाने तिला शेतातून बाहेर आणले. याबाबत कोणाला काही बोललीस तर तुझ्या वडीलांना ठार मारेन, अशी धमकी दिली. यानंतर तिला घेऊन विवाहस्थळी आला. तिला वडीलाकडे दिले आणि तो तत्काळ तेथून पसार झाला.

प्रारंभी वडीलांना काहीच समजले नाही. मात्र, नराधम पळून गेल्यानंतर काही वेळाने चिमुरडीने टाहो फोडला. यानंतर तिच्या अंगावरील कपडे आणि त्यावरील डाग, अंगावरील जखमा पाहताच, वडीलांचे धाबेच दणाणले. तिला तत्काळ सीपीआर रुग्णालयात आणण्यात आले. वैद्यकीय तपासणीत अतिप्रसंग झाल्याचे स्पष्ट झाले. या घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ अधिकारी सीपीआरमध्ये दाखल झाले. त्यांनी माहिती घेत तपासाला सुरवात केली. रात्री उशिरापर्यंत या प्रकरणी गुन्हा नोंद करण्याचे काम सुरू होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT