कांचनताई परुळेकर यांचे निधन  Pudhari Photo
कोल्हापूर

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या कांचनताई परुळेकर यांचे निधन

Kanchantai Parulekar | पंचगंगा स्मशानभूमीत उद्या अंत्यसंस्कार

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : ‘स्वयंसिद्धा’ संस्थेच्या संचालिका आणि ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या कांचनताई परुळेकर (वय ७४) यांचे आज (दि.२६) दुपारी ३ वाजता निधन झाले. त्या गेली काही वर्षे आजारी होत्या. दोन दिवसांपूर्वी त्यांची प्रकृती खालावली होती. त्यांनी आज अखेरचा श्वास घेतला. त्यांच्यावर गुरुवारी (दि. २७) पंचगंगा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

त्यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन संध्याकाळी ५ पासून स्वयंसिद्धा ऑफिस, सरोज संकुल, साईक्स एक्स्टेंशन येथे घेता येणार आहे. गुरूवारी सकळी ९ वाजता स्वयंसिद्धाच्या मुख्य कार्यालयातून अंत्ययात्रा निघेल.

बँकेतील नोकरी सोडून त्यांनी महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी काम सुरू केले होते. महिला सबलीकरणासाठी त्यांनी अनेक उपक्रम राबविले. ग्रामीण महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी करण्यासाठी त्यांनी रोजगार प्रशिक्षण, उद्योग मेळावे घेतले. महिला सबलीकरणाची चळवळ गेली ३३ वर्षे त्यांनी अखंडपणे सुरू ठेवली होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT