कोल्हापूर : महागड्या दुचाकींची चोरी करून सुट्या पार्टची विक्री करणार्‍या रांगोळी (हातकणंगले) येथील चोरट्याला राजारामपुरी पोलिसांनी रविवारी जेरबंद केले. त्याच्याकडून सुटे पार्ट व वाहनांचे सांगाडे हस्तगत करण्यात आले.  Pudhari File Photo
कोल्हापूर

दुचाकींची चोरी करून सुट्या पार्टची विक्री

चोरट्याला अटक : संशयित रांगोळीचा; 4 गुन्ह्यांची कबुली

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : शहर, जिल्ह्यासह ग्रामीण भागातून नवीन महागड्या दुचाकींची चोरी करून त्याच्या सुट्या पार्टची विक्री करणार्‍या पोलिस रेकॉर्डवरील सराईत चोरट्याला राजारामपुरी पोलिसांनी रविवारी बेड्या ठोकल्या. राहुल बंडोपंत मोरे (वय 34, रा. माळवाडी, रांगोळी, ता. हातकणंगले) असे त्याचे नाव आहे. संशयिताने चार गुन्ह्यांची कबुली दिली आहे. 85 हजार रुपये किमतीचे दुचाकीचे सुटे पार्ट हस्तगत करण्यात आले आहेत.

चोरट्याने सांगली ग्रामीण, विश्रामबाग, कर्नाटकातील सदलगा, माणकापूर (चिक्कोडी) येथील महागड्या दुचाकी चोरल्याची कबुली दिली आहे. असे राजारामपुरी पोलिस ठाण्याचे निरीक्षक सुशांत चव्हाण, गुन्हे शोध पथकाचे सहायक निरीक्षक दत्तात्रय भोजणे यांनी सांगितले. रांगोळी (ता. हातकणंगले) येथील महादेव देवणे यांच्या उसाच्या शेतातून तसेच जवळच असलेल्या विहिरीतून चोरलेल्या दुचाकीच्या सुट्या भागांसह वाहनाचे सांगाडे हस्तगत करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. संशयित राहुल मोरे सराईत गुन्हेगार असून कोल्हापूर, सांगलीसह बेळगाव जिल्ह्यातही त्याने गुन्हे केले आहेत. उजळाईवाडी येथील सुशील जवळगेकर (वय 62) यांच्या मालकीची दुचाकी राजारामपुरी येथील व्ही. टी. पाटील भवन येथून चोरीला गेली. वाहन चोरट्याचा शोध घेताना गुन्हे शोध पथकाने कोल्हापूर शहरासह मानकापूर, चिकोडी, गोवा परिसरातील 135 सीसीटिव्ही कॅमेर्‍यांचे फुटेज तपासण्यात आले.

त्यामध्ये संशयित राहुल मोरे यांचा चेहरा निष्पन्न झाला. चौकशीअंती संशयित माळवाडी, रांगोळी परिसरातील असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर त्यास ताब्यात घेण्यात आले. पोलिस चौकशीत त्याने वाहन चोरीसह सुट्या भागांच्या विक्रीची कबुली दिली. चौकशीत दुचाकीसह अन्य गंभीर गुन्हे उघडकीला येण्याची शक्यताही सुशांत चव्हाण यांनी दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT