'See and Win' Competition by 'Pudhari' Kasturi Club and Sony Marathi
खास कस्तुरींसाठी हजारोंची बक्षिसे जिंकण्याची संधी file photo
कोल्हापूर

खास कस्तुरींसाठी हजारोंची बक्षिसे जिंकण्याची संधी

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : दै. 'पुढारी' आणि सोनी मराठी यांच्या संयुक्त विद्यमाने 'तू भेटशी नव्याने' मालिकेच्या निमित्ताने 'पहा आणि जिंका' स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या महिलांमधून लकी ड्रॉद्वारे विजेत्या महिलांची निवड करण्यात येणार आहे. तीन विजेत्यांना हजारो रुपयांची बक्षिसे जिंकण्याची संधी उपलब्ध होणार आहेत.

स्पर्धेत कसे सहभागी व्हावे

या स्पर्धेत सहभागासाठी कस्तुरींना सोमवार (दि. ८) ते बुधवार (दि. १०) दरम्यान रोज रात्री ९.०० वाजता सोनी मराठीवर प्रसारित होणारी 'तू भेटशी नव्याने' ही मालिका पाहायची आहे. मालिका संपल्यानंतर (रात्री ९.३० वाजता) कस्तुरी सदस्यांना दै. पुढारी कस्तुरी क्लब सभासदांच्या व्हॉटस्अॅप ग्रुपवर एक लिंक आणि क्यूआर कोड मिळेल. त्या लिंकवर क्लिक करून किंवा क्यूआर कोड स्कॅन करून उघडणाऱ्या फॉर्ममध्ये तुमचं नाव, गाव, कस्तुरी क्लब सदस्य क्रमांक आणि मालिकेतील त्या दिवसाच्या भागावर आधारित प्रश्न असेल. फॉर्ममध्ये सर्व माहिती आणि प्रश्नाचे अचूक उत्तर टाकून फॉर्म सबमिट करा. प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी दुसऱ्या दिवसाच्या संध्याकाळी ६ वाजेपर्यंत वेळ असेल. तिन्ही दिवस तुम्हाला अचूक उत्तर द्यायचे आहे. तिन्ही दिवस अचूक उत्तर देणाऱ्या महिलांमधून लकी ड्रॉद्वारे तीन विजेत्या निवडल्या जातील आणि त्यांना सोनी मराठीकडून गिफ्ट व्हाऊचर्स मिळतील.

  • पहिले बक्षीस : ७५००

  • दुसरे बक्षीस : ५०००

  • तिसरे बक्षीस : २५००

(बक्षिसांची रक्कम शॉपिंग गिफ्ट व्हाऊचर्सच्या स्वरूपात)

अटी आणि नियम

फक्त दै. 'पुढारी' कस्तुरी क्लब सदस्यच या स्पर्धेत सहभागी होऊ शकतात. एका दिवसात एका सदस्याला एकदाच प्रवेश मिळेल. तिन्ही दिवसांमधील तिन्ही प्रश्नांची अचूक उत्तरे देणाऱ्यांची नावे लकी ड्रॉसाठी घातली जातील. ही स्पर्धा पुणे, पिंपरी चिंचवड, कोल्हापूर, सांगली, सातारा, इस्लामपूर, गडहिंग्लज, कराड आणि इचलकरंजी या आठ विभागांमध्ये घेतली जाईल. बक्षिसे ऑनलाईन शॉपिंग गिफ्ट व्हाऊचर्सच्या स्वरूपात असतील. स्पर्धा आयोजित करणे/थांबवणे, अटी बदलणे इत्यादी अधिकार दै. 'पुढारी' आणि सोनी मराठी व्यवस्थापनाकडे राखीव आहेत. या स्पर्धेबाबतचे वाद कोल्हापूर न्यायालयाच्या क्षेत्राखाली येतील.

अधिक माहितीसाठी संपर्क

  • कोल्हापूर : उज्ज्वला - ९९२३६१७७६९ / स्नेहा- ९४२३८२४९९७

  • इचलकरंजी : प्राची - ९८९०९७८१०९

  • गडहिंग्लज : श्रेया - ९४२३५३९५६१

SCROLL FOR NEXT